Black Water Benefits : सेलिब्रिटींमध्ये 'Black Water' ची क्रेझ का? फिट तर ठेवतेच पण शरीराला मिळतात 'हे' ही फायदे
Black Water Benefits : निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.
Black Water Benefits : आजकाल लोक निरोगी राहण्यासाठी अनेक आरोग्यदायी सवयी फॉलो करत आहेत. काही लोक हेल्दी डाएट फॉलो करतायत. तर काही वर्कआउट्स वगैरेच्या मदतीने स्वतःला तंदुरुस्त ठेवतायत. या व्यतिरिक्त आजकाल लोक पाणी पिऊन स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतायत. निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. असेच एक पाणी आजकाल सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. या पाण्याला 'ब्लॅक वॉटर' म्हणून ओळखले जाते.
या पाण्याचे नाव थोडे विचित्र वाटेल, परंतु त्याच्या फायद्यांमुळे त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. सोशल मीडियावर दररोज अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्ती त्यांच्या आहार आणि दैनंदिन दिनचर्याबद्दल बोलताना दिसतात. यासाठीच ब्लॅक वॉटरचे फायदे कोणते आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
ब्लॅक वॉटर म्हणजे काय?
ब्लॅक वॉटर हे अनेक पोषक तत्वांनी युक्त अल्कधर्मी पाणी आहे. त्यात कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी खनिजे आढळतात. ब्लॅक वॉटर पिण्याचे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
डीहायड्रेशनपासून संरक्षण
काळ्या पाण्याचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यामुळे डिहायड्रेशनपासून संरक्षण होते. डीहायड्रेशनमुळे रक्तातील स्निग्धता कमी करण्याची शक्ती त्याच्या क्षारीय स्वरूपामध्ये आहे. सहसा व्यायामानंतर आपलं शरीर डीहायड्रेट होते.
चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास उत्तम
काळे पाणी हे अल्कधर्मी असते, जे तुमच्या पोटात चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत करते. या गुणामुळे पचन आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते .
शरीर डिटॉक्स करण्यास उपयुक्त
काळे पाणी गॅस्ट्रिक ऍसिडचे स्राव देखील नियंत्रित करू शकते. यामुळे पित्त मूत्राशयाचे कार्य सुलभ करण्यास आणि शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास मदत होते.
वृद्धत्व टाळण्यास मदत
काळ्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे वृद्धत्व टाळण्यास मदत करतात आणि शरीरात डिटॉक्स म्हणून कार्य करतात. हे पाणी शरीराचे कोणत्याही प्रकारचे होणारे नुकसान कमी करते आणि त्याचे कार्य चांगले ठेवण्यास मदत करते.
मधुमेहावर प्रभावी
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर काळे पाणी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. हे HbA1c आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :