एक्स्प्लोर

Grey Hair Remedies : केस अकाली पांढरे होतायत? घरच्या घरी ट्राय करा ‘हे’ उपाय..

खराब जीवनशैली, हार्मोनल बदल, केसांसाठी चुकीच्या उत्पादनांचा वापर ही देखील अकाली पांढऱ्या केसांच्या समस्येची कारणे असू शकतात.

Grey Hair Remedies : केस अकाली पांढरे होणे ही आजकाल सामान्य समस्या झाली आहे. आता लोकांचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले आहेत. केस पांढरे होण्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावरही होतो. अशा स्थितीत त्यांच्याकडे वेळीच लक्ष देऊन ही समस्या मुळापासून दूर करणे अत्यंत आवश्यक आहे.

आयुष्यातील ताणतणाव वाढल्याने आरोग्यासोबत केसांचेही नुकसान होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खराब जीवनशैली, हार्मोनल बदल, केसांसाठी चुकीच्या उत्पादनांचा वापर ही देखील या समस्येची कारणे असू शकतात. तथापि, काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता आणि नैसर्गिकरित्या तुमचे केस पुन्हा काळे करू शकता.

चहाची पाने

केसांच्या आरोग्यासाठी चहाची पाने खूप फायदेशीर असतात. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जो केसांच्या आरोग्यासाठी एक आवश्यक घटक आहे. यासाठी प्रथम चहाची पाने पाण्यात उकळून थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर केसांच्या मुळांना लावून काही वेळ मसाज करा. एक तासानंतर साध्या पाण्याने केस धुवा.

आवळा

आवळा केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये लोह, व्हिटॅमिन सी, झिंक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील भरपूर असतात, जे केसांच्या मजबूतीसाठी, काळेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी आवश्यक घटक आहेत. आवळा मेहंदीसोबतही वापरता येतो. ताज्या आवळ्याचा रस केसांच्या मुळांनाही लावू शकता. त्याची पावडर पेस्ट बनवूनही वापरता येते.

मेथी

आवळ्या व्यतिरिक्त, मेथी देखील नैसर्गिकरित्या केस काळे करू शकते. मेथीमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, जे केस काळे ठेवण्यास मदत करतात. यासाठी दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक करून केसांच्या मुळांना लावा. खोबरेल किंवा बदामाच्या तेलात मिसळून केसांमध्ये हेअर पॅक म्हणूनही वापरता येईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोरSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेगABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget