Skin Care Tips : लिंबू सौंदर्य वाढवतं, पण 'या' पद्धतीने वापरल्यास चेहराही खराब होऊ शकतो! तुम्हीही 'ही' चूक करताय का?
Lemon Juice And Skin : लिंबाचा रस त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे, परंतु त्याचा रस थेट त्वचेवर लावू नका.
Lemon Juice And Skin : सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करतो. अशा वेळी मेडिकल ट्रिटमेंटपेक्षा काही लोक असेही आहेत जे घरगुती उपचार आणि नैसर्गिक गोष्टींवर भर देतात. पण काही नैसर्गिक गोष्टी देखील त्वचेला हानी पोहोचवू शकतात. यामध्ये लिंबाचा उल्लेखही येतो. खरंतर, लिंबू आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे, परंतु जर तुम्ही त्याचा रस थेट तुमच्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर लावला तर त्याचे अनेक दुष्परिणाम दिसू शकतात. चला जाणून घेऊयात लिंबाच्या रसाचे त्वचेवर कोणते दुष्परिणाम होतात.
लिंबू त्वचेसाठी का हानिकारक आहे?
लिंबूमध्ये ब्लीचिंग इफेक्ट्स आढळतात, त्यामुळे ते त्वचेसाठी प्रभावी असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे डाग दूर करते. मात्र, तरीही त्याचा रस थेट त्वचेवर लावू नये. कारण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
लिंबाचा रस थेट त्वचेवर का लावू नये?
लिंबाचा रसात अनेक गोष्टी जेव्हा मिसळल्या जातात तेव्हाच तो त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो. यामुळे त्याचा समतोल राखला जातो, परंतु काहीही न मिसळता फक्त लिंबाचा रस त्वचेवर लावल्यास लालसरपणा येतो आणि खाज येण्याची समस्या निर्माण होते.
लिंबाचा रस थेट त्वचेवर लावल्यास कोणते नुकसान होईल?
जर तुम्ही लिंबाचा रस थेट तुमच्या त्वचेवर लावत असाल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्वचेवर सनबर्न होण्याचा धोका वाढतो. काही लोकांची त्वचा अशी असते की थेट शुद्ध स्वरूपात लिंबाचा रस लावल्याने केमिकल ल्युकोडर्मा आणि फायटोफोटोडर्माटायटीस सारख्या त्वचेच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. यामुळे खाज आणि जळजळ देखील वाढू शकते.
त्यामुळे तुम्हीदेखील सुंदर दिसण्यासाठी त्वचेवर किंवा चेहऱ्यावर लिंबाचा वापर करत असाल तर तो लगेच बंद करा. लिंबामध्ये अनेक पदार्थ मिसळून अत्यंत कमी प्रमाणात चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. जर, तुमची स्किन खूपच सेन्सिटिव्ह असेल तर कोणतेही उपचार करण्यापूर्वी एकदा त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Saffron Water Benefits : सकाळी चहाऐवजी केशरचं पाणी प्या; आरोग्याला मिळतील अनेक आश्चर्यकारक फायदे