Beauty Tips : डार्क सर्कल्स आलेत? ट्राय करा हे घरगुती उपाय, झटपट होतील गायब
जर तुम्हाला डार्क सर्कल्स घालवायचे असतील तर हे घरगुती उपाय तुम्ही ट्राय करु शकता.
Dark Circle Home Remedies : अनेक वेळ लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर केल्यानं डार्क सर्कल्सची (Dark Circles) समस्या जाणवते. तसेच झोप पूर्ण न झाल्याने देखील तुम्हाला डार्क सर्कल्स येऊ शकतात. जर तुम्हाला डार्क सर्कल्स घालवायचे असतील तर हे घरगुती उपाय तुम्ही ट्राय करु शकता.
थंड दूधाचा वापर करा (Cold Milk)
कापसाचा एक बोळा थंड दूधामध्ये भिजवा. तो कापूस 20 ते 30 मिनट डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे डोळ्यखाली आलेली काळी वर्तुळ म्हणजेच डार्क सर्कल्स कमी होतील.
गुलाब पाणी (Rose Water)
गुलाब पाणी कापसावर टाकून तो कापूस डोळ्यांवर फिरवा. त्यामुळे डोळे थंड होतात आणि डार्क सर्कल्स कमी होतात.
मध आणि लिंबाचा रस
कच्च दूध, मध आणि लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीनं डोळ्यांवर लावा. 20 मिनीट मिश्रणात भिजवलेला कापूस डोळ्यांवर फिरवा. काही दिवसांमध्ये तुम्हा फरक जाणवेल.
एका रिपोर्टनुसार शरीरात जर लोहाचे प्रमाण कमी असेल तरी देखील डार्क सर्कल्स होतात. त्यामुळे पालक, ब्रॉकली, वटाणे यांसारख्या लोह असणाऱ्या भाज्या खाव्यात. व्हिटॅमिन सी, कोजिक अॅसिड आणि हायलूरोनिक अॅसिड यूक्त क्रिम रोज डोळ्यांच्या बाजूला आलेल्या डार्क सर्कल्सला लावावी. रात्री झोपताना आणि सकाळी ही क्रिम लावल्याने काही दिवसांमध्येच तुमचे डार्क सर्कल्स निघून जातील. तसेच डोळ्यांभोवती तुम्ही मुलतानी माती देखील लावू शकता.
पाणी कमी प्यायल्यानं होऊ शकतात डार्क सर्कल्स
शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही दिवभरात पाणी कमी प्यालात तर तुम्हाला डार्क सर्कल्स होऊ शकतात. दिवसभरातून कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी पिले पाहिजे. तसेच रात्री झोपताना डोळ्यांवर आइस पॅक लावा त्याने देखील तुमचे डार्क सर्कल्स जातील. तसेच डोळ्यांवर थंड काकडी देखील तुम्ही ठेवू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा: