एक्स्प्लोर

कोरफड एक फायदे अनेक, आपल्या घरात असलेल्या कोरफडीचे फायदेच फायदे, जाणून घ्या

Aloe vera  : आपल्या घरात आपण कुंडीमध्ये वगैरे कोरफड लावतो. या कोरफडीचे अनेक फायदे आहेत.

Aloe vera  : आपल्या घरात आपण कुंडीमध्ये वगैरे कोरफड लावतो. या कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफड सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा डोळे-केस यांची निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरते. कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते. श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो. (Aloe vera uses Benefits helpful for eyes and hair care)

कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, अॅसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते. दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याधी असे आजार कमी होतात.

मोबाईल, कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे किंवा झोप न झाल्याने डोळे चुरचुरत असतील, तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो. डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्यांना लावल्याने फायदा होतो.

अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते. जळणं, भाजणं, आग होणं, पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते. रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन त्वचेला लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरकुत्या, पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात. त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो.

कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

टीप- गंभीर आजार असणारांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोरफडीचा वापर करावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Embed widget