ITBP Recruitment 2022 : आईटीबीपीमध्ये बंपर भरती, बारावी पास करा अर्ज
ITBP Bharti 2022 : आयटीबीपीमध्ये हेड कांस्टेबल (HC) आणि असिस्टेंट सब इंस्पेक्टर (ASI) पदांवरील भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
ITBP Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. आईटीबीपीमध्ये (ITBP) नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात भरती सुरु आहे. ITBP मध्ये हेड कांस्टेबल (HC) आणि असिस्टेंट सब इंस्पेक्टर (ASI) (स्टेनोग्राफर - Stenographer) या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत 286 पदांवर भरती केली जाणार आहे. आयटीबीपीकडून (ITBP) या भरतीद्वारे थेट प्रवेश आणि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE) अंतर्गत भरती करण्यात येणार आहे.
यामध्ये 158 पदे हेड कॉन्स्टेबल (पुरुष आणि महिला), 90 हेड कॉन्स्टेबल, 21 असिस्टेंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) आणि 17 ASI स्टेनो LDCE साठी भरती करण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 08 जूनपासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 जुलै आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. हेड कॉन्स्टेबलसाठी इंग्रजीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे. तर असिस्टेंट सब इंस्पेक्टर पदासाठी इच्छिक उमेदवाराला संगणकावर 80 शब्द प्रति मिनिट 10 मिनिटं डिक्टेशन आणि प्रति मिनिट इंग्रजीमध्ये 50 शब्द प्रति मिनिट वेग असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
हेड कॉन्स्टेबल - किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे
हेड कॉन्स्टेबल (LDCE) - 18 ते 35 वर्षे
असिस्टेंट सब इंस्पेक्टर स्टेनो भरती - 18 ते 25 वर्षे
असिस्टेंट सब इंस्पेक्टर स्टेनो LDCE - 18 ते 35 वर्षे
निवड प्रक्रिया
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), कौशल्य चाचणी, तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (DME) आणि वैद्यकीय परीक्षा (RME) द्वारे केली जाईल.
पगार
हेड कॉन्स्टेबल - 25,500 रुपये ते 81,100 रुपये
ASI कॉन्स्टेबल - 29,200 रुपये ते 93,200 रुपये
अर्ज कसा करावा
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या