एक्स्प्लोर

RBI Assistant Recruitment : आरबीआयमध्ये असिस्टंट पदाच्या 650 जागांसाठी भरती, 58514 रुपये पगार मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

RBI Assistant Recruitment : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 650 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहायक पदाच्या  650 जागंसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी सहायक पदासाठी ऑनलाईन पद्धतीनं आरबीआयच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. आरबीआयकडून सहायक पदासाठी दोन टप्प्यात परीक्षा घेतलीजाईल. यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषा प्राविण्यता चाचणी उमेदवारांना द्यावी लागेल. 

सहायक पदासाठी पात्रता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहायक पदाच्या 650 जागांसाठी अर्ज दाखल करणारे उमेदवार भारतीय नागरीक असावेत. याशिवाय उमेदवारानं भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी  50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही अट शिथील आहे. याशिवाय उमेदवारांना संगणकाची हाताळणी करता येणं आवश्यक आहे. 

आरबीआयच्या सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 28 वयोमर्यादेदरम्यान असावं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत शिथील असेल. तर, ओबीसी उमेदवार 31 वर्षांपर्यंत अर्ज दाखल करु शकतात.   

महत्त्वाच्या तारखा

आरबीआयच्या सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 16 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान अर्ज दाखल करावेत. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनं जमा करायचं आहे. सहायक पदासाठी पूर्व परीक्षा 11 एप्रिल रोजी होणार आहे. तर, मुख्य परीक्षा 7 जूनला होईल. परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यासंदर्भातील अधिकार आरबीआयनं त्यांच्याकडे राखून ठेवले आहेत.विशेष बाब म्हणजे परीक्षा कालावधीमध्ये मोबाईल आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

परीक्षेचं स्वरुप :

सहायक पदाची भरती प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 100 गुणांची पूर्व परीक्षा होईल. त्यानंतर  200 गुणांची मुख्य परीक्षा उमेदवारांना द्यावी लागेल. शेवटी भाषा प्राविण्यता चाचणी द्यावी लागेल. 

पूर्व परीक्षेत इंग्रजी भाषा, गणितीय क्षमता आणि तार्किक क्षमता यावर प्रश्न असतील. तर, मुख्य परीक्षेत तार्किक क्षमता, इंग्रजी भाषा, गणिती क्षमता, सामान्य ज्ञान आणि संगणक ज्ञान यावर एकूण 200 प्रश्न विचारले जातील.   

आरबीआयच्या सहायक पदाच्या एकूण 650 जागांपौकी 110 जागा अनुसूचित जाती,37 जागा अनुसूचित जमाती, 99 जागा ओबीसी प्रवर्ग, 58 जागा ईडब्ल्यूएस आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 346  जागा राखीव आहेत. 650 पैकी मुंबई कार्यालयात 249  जागा आणि नागपूर कार्यालयात 17 जागा भरल्या जाणार आहेत. मुंबईतील कार्यालयात 54 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 2 जागा अनुसूचित जमाती, ओबीसींसाठी 25, ईडब्ल्यूएससाठी 24 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 144 जागा राखीव असतील. 

दरम्यान,सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये परीक्षा शुल्क आणि 18 टक्के जीएसटी रक्कम भरावी लागेल. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि माजी सैनिक, दिव्यांग उमेदवारांना 50 रुपये शुल्क आणि 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Embed widget