(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CRIS Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, उरलेत शेवटचे दोन दिवस, लवकर करा अर्ज
CRIS Recruitment 2022 : सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमने सहाय्यक डेटा विश्लेषक (Assistant Data Analyst) आणि सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता (Assistant Software Engineer) या 150 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
CRIS Recruitment 2022 : CRIS म्हणजेच सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमकडून (Centre for Railway Information System) सहाय्यक डेटा विश्लेषक (Assistant Data Analyst) आणि सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता (Assistant Software Engineer) पदांवरील भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत 150 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 मे 2022 ही शेवटची तारीख आहे. 26 एप्रिलपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती अंतर्गत 144 सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता (Assistant Software Engineer) आणि 6 सहाय्यक डेटा विश्लेषक (Assistant Data Analyst) पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार cris.org.in या अधिकृत वेबसाईटवर अर्झ करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छिक उमेदवाराकडे 60 टक्के गुणांसह CSE/CS/CT/IT/CSIT मध्ये BE/B.Tech किंवा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन पदवी असणं आवश्यक आहे. याशिवाय असिस्टंट डेटा अॅनालिस्टसाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील BE/B.Tech/ME/M.Tech असणं आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांचा GATE 2022 स्कोअर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीअंतर्गत अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचं वय 22 ते 27 वर्षे दरम्यान असावे. विविध राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारा अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या