एक्स्प्लोर

Mega Bharti : मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी नोकरभरती होणार, MPSC कडून 20 हजार पदांची भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Maharashtra Mega Bharti : भरती प्रक्रियेत कोणताही पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रणाली पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

मुंबई : राज्यात लवकरच सुमारे 70 हजार पदांची मोठी नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही भरती नव्या, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. या भरतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सुमारे 20 हजार पदांचा समावेश असेल, तर उर्वरित पदे आयोगाबाहेरील विविध विभागांमध्ये भरली जाणार आहेत.

सेवा प्रवेश नियमावलीत मोठे बदल (Maharashtra Service Entry Rules Reform)

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणा संदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.

भरती प्रक्रियेत आवश्यक कौशल्ये (Skills Based Recruitment), पात्रता निकष आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेतले जातील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सेवा प्रवेश नियमावलीतील बदलांचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे.

पारदर्शक आणि डिजिटल भरती प्रक्रिया (Transparent Digital Recruitment Process)

भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाइन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Verification) आणि डिजिलॉकर प्रणालीचा (DigiLocker System) वापर करून प्रमाणपत्र पडताळणी सुलभ करण्यात येईल. पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाइन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्य प्रशासनात कार्यक्षमतेला गती (Administrative Efficiency Boost)

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये 70 हजार पदे भरल्यानंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल. भरती प्रक्रियेत कोणताही पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रणाली पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तरुणांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी स्वच्छ, वेगवान आणि तंत्रज्ञानाधारित भरती प्रणाली उभारण्यावर शासनाचा भर असेल.

महाराष्ट्राचे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक (Maharashtra Governance Model)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाचे मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल (Human Resource Management Model) सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. इतर राज्यांनीही हे मॉडेल स्वीकारावे, असे निर्देश पंतप्रधानांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे (Governance Reform Model) नवे मॉडेल उभे राहील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
MNS Vardhapan Din 2026 : रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Amol Mitkari : अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर पिंकी मालीच्या आईची अमोल मिटकरींनी घेतली भेट; नेमकं कारण काय?
अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर पिंकी मालीच्या आईची अमोल मिटकरींनी घेतली भेट; नेमकं कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget