(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 'या' रिक्त पदांसाठी जागा, त्वरित करा अर्ज
IOCL Jobs 2022: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
IOCL Jobs 2022: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 7 जून 2022 आहे. यासाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. अधिसूचनाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत साईट iocl.com ला भेट द्यावी. या भरती प्रक्रियेद्वारे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची 35 पदे आणि अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची 8 पदे भरण्यात येणार आहेत.
पात्रता निकष
या जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून विविध अनुभव पात्रता विचारली जाते, जे ते अधिकृत अधिसूचनेत तपासू शकतात. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे पदाप्रमाणे वेगवगेळी वयोमर्यादा आहे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कमाल वय 35 वर्षे आणि अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 50 वर्षे आहे.
इतकी आहे अर्जाची फी
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 300 रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना हे शुल्क एसबीआयच्या ई-कलेक्शनद्वारे जमा करावे लागेल.
ही आहे निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत, या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
याप्रमाणे अर्ज करा
अर्जाची फी भरल्यानंतर उमेदवाराने भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह The Advisor, Post Box No. 3096, Head Post Office, Lodhi Road, New Delhi-110003 येथे पाठवावा लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या