India Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागाकडून 'या' पदांसाठी भरती जाहीर; आठवी पास उमेदवारही करु शकतात अर्ज
India Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागानं ग्रुप सीच्या विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 9 मेपर्यंत ऑफलाईन अर्ज करु शकता.
India Post Recruitment 2022 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. भारतीय टपाल विभागात (India Post) भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय टपाल विभाग, महाराष्ट्रानं अराजपत्रित आणि अ-मंत्रालयीन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायर मॅनसह इतर पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 09 मे 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरती अंतर्गत पदांची संख्या जाणून घ्या
- मेकॅनिक : 5 पदं
- इलेक्ट्रिशियन : 2 पदं
- टायर मॅन : 1 पदं
- लोहार : 1 पदं
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सरकारद्वारे मान्यता प्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेतील संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्रासह आठवी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमधील एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मेकॅनिक ट्रेडसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे अवजड वाहनांचा वैध ड्रायव्हिंग परवाना असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचं वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावं, असं भारतीय टपाल विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड आवश्यक पात्रता आणि स्पर्धात्मक चाचण्यांच्या आधारे केली जाईल.
वेतन
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19900 रुपये वेतन दिलं जाईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया
या भरतीच्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी, उमेदवारांनी 09 मे 2022 पर्यंत अर्ज "वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सर्व्हिस, 134-A, सुदाम कालू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- 400018" या पत्त्यावर पाठवावा. इतर कोणत्याही माहितीसाठी उमेदवार indiapost.gov.in या वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IOCL Recruitment 2022 : एक लाखभर रुपये प्रतिमाह मिळवण्याची नामी संधी, सरकारी नोकरीची संधी
- 12वी पास आणि पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या कुठे आणि कसा करू शकता अर्ज
- UPSC Recruitment : परीक्षा न देताच मिळवा सरकारी नोकरी, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha