(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UPSC Recruitment : परीक्षा न देताच मिळवा सरकारी नोकरी, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक
Union Public Service Commission Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अनेक पदांसाठी भरती जारी.
Union Public Service Commission Recruitment : प्रत्येकालाच सरकारी नोकरी मिळण्याची अपेक्षा असते, तुम्हीही यापैकीच एक असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) अनेक पदांवर सरकारी नोकऱ्यांसाठी भरती काढली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.
इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ जाऊ न देता लवकरात लवकर अर्ज करावा. महत्त्वाची बाब म्हणजे, या नोकऱ्या मिळवण्यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. ही तरुणांसाठी आनंदाची बाब आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 45 जागांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन एकदा संपूर्ण तपशील वाचून घ्यावा.
भरतीसंदर्भातील माहिती :
- असिस्टंट एग्झिक्युटिव्ह इंजीनियर (इलेक्ट्रॉनिक्स) : 3
- सिस्टम एनालिस्ट : 6
- सिनिअर लेक्चरर (जनरल मेडिसिन) : 1
- सिनिअर लेक्चरर (जनरल सर्जरी) : 1
- सिनिअर लेक्चरर (तपेदिक और श्वसन रोग) : 1
- असिस्टेंट एडिटर (तेलगू) : 1
- फोटोग्राफिक ऑफिसर, सायंटिस्ट 'बी' (टॉक्सिकोलॉजी) : 1
- सायंटिस्ट 'बी' (टॉक्सिकोलॉजी) : 1
- टेक्निकल ऑफिसर (पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग) : 4
- ड्रिलर-इन-चार्ज : 3
- डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइन्स सेफ्टी (मॅकेनिकल) : 23
उमेदवारांसाठी वयोमर्यादा :
- वैज्ञानिक 'बी' (विष विज्ञान) : 35 वर्ष
- टेक्निकल ऑफिसर (पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग) : 35 वर्ष
- ड्रिलर-इन-चार्ज : 30 वर्ष
- असिस्टंट एडिटर (तेलगू) : 35 वर्ष
- फोटोग्राफिक ऑफिसर, साइंटिस्ट 'बी' (टॉक्सिकोलॉजी) : 30 वर्ष
- खान सुरक्षा उप निदेशक (मॅकेनिकल) : 40 वर्ष
- सहाय्यक कार्यकारी अभियंता, (इलेक्ट्रॉनिक्स) : 35 वर्ष
- सिस्टम एनालिस्ट : 35 वर्ष
- वरिष्ठ व्याख्याता : 50 वर्ष
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : आयकर, महावितरण आणि रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीच्या संधी, असा करा अर्ज
- Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, प्रतिमाह 60 हजार मिळवण्याची संधी
- Job Majha : बुलढाणा महावितरण, सांगली महापालिकेत नोकरीच्या संधी, कुठे करायचा अर्ज?
- Job Majha : Bank of Baroda येथे ठिकाणी नोकरीच्या संधी; असा करा अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha