(Source: ECI/ABP News/ABP Majha)
12वी पास आणि पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या कुठे आणि कसा करू शकता अर्ज
Goverment Jobs : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
Goverment Jobs : 12वी पास आणि पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट nia.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 आहे. इच्छुक उमेदवार नोंदणीकृत पोस्टद्वारे या भरतीच्या या पदांसाठी अर्ज करू शकतील. 7 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रिक्त जागांचा तपशील
एकूण रिक्त पदे : 67
सहाय्यक उपनिरीक्षक : 43 पदे
हेड कॉन्स्टेबल : 24 पदे
शैक्षणिक पात्रता
ASI साठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तर हेड कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट
या भरतीअंतर्गत पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरताना त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या पाहिजेत. फक्त कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती पाठवाव्या लागतील. त्यानंतर ते दिलेल्या पत्त्यावर पाठवा - SP (अॅडमिन), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली - 110003.
निवड प्रक्रिया
लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे या भरती अंतर्गत पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : आयकर, महावितरण आणि रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीच्या संधी, असा करा अर्ज
- Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, प्रतिमाह 60 हजार मिळवण्याची संधी
- Job Majha : बुलढाणा महावितरण, सांगली महापालिकेत नोकरीच्या संधी, कुठे करायचा अर्ज?
- Job Majha : Bank of Baroda येथे ठिकाणी नोकरीच्या संधी; असा करा अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha