EIL: मॅनेजरपदासह इतर पदांवर थेट भरती; अर्ज करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक
Engineers India Limited Recruitment 2022 : इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. यामध्ये मॅनेजरपदाचाही समावेश आहे.
Engineers India Limited Recruitment 2022 : इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) ने एकूण 7 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. अधिसूचनेनुसार, भरल्या जाणार्या पदांमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि मॅनेजर या पदांचा समावेश आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२२ आहे.
रिक्त जागांचा तपशील
उपमहाव्यवस्थापक- २ पदे
असिस्टंट जनरल मॅनेजर - 1 पद
वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक - 4 पदे
आवश्यक पात्रता निकष
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह केमिकल इंजिनीअरिंगमध्ये BE/B Tech/BSc (Eng) पदवी पूर्ण केलेली असावी. उमेदवारांना किमान 8 ते 19 वर्षांचा अनुभव असावा. हा अनुभव हायड्रोकार्बन रिफायनरी/पेट्रोकेमिकल प्लांटच्या पूर्व-कमिशनिंग/कमिशनिंग/ऑपरेशनमधील असावा.
वयोमर्यादा :
डेप्युटी जनरल मॅनेजर : अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४७ वर्षे आहे.
असिस्टंट जनरल मॅनेजर : अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४४ वर्षे असावी.
वरिष्ठ व्यवस्थापक : अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असावी.
व्यवस्थापक : अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३६ वर्षे असावी.
निवड प्रक्रिया :
उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे होईल.
अर्ज कसा करावा ?
> अर्ज करण्यासाठी, EIL ची वेबसाइट http://www.engineersindia.com ला भेट द्या.
> करिअर लिंक वर जा.
> वेबसाइटवर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
> ऑनलाइन फॉर्म भरा.
> आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- 12वी पास विद्यार्थ्यांसाठी 'या' पदांवर आहेत रिक्त जागा, 81 हजारांपर्यंत मिळू शकतं वेतन, लगेच करा अर्ज
- India Post Recruitment 2022 : अल्पशिक्षित तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; प्रतिमाह 63000 पर्यंत मिळू शकतं वेतन
- Jobs : फक्त मुलाखत देऊन मिळणार सरकारी नोकरी, पगार लाखात