Jobs : फक्त मुलाखत देऊन मिळणार सरकारी नोकरी, पगार लाखात
महाराष्ट्र लोक सेवा आयोगांतर्गत (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातील परीक्षा संशोधन अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मार्च 2022 आहे.
MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागात नोकरी मिळवण्याची मोठी संधी याहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगांतर्गत (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातील परीक्षा संशोधन अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी परीक्षा संशोधन कार्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार सकारच्या mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मार्च 2022 आहे.
'या' उमेदवारांना करता येणार अर्ज
महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा महाराष्ट्र वैधानिक विद्यापीठाच्या कार्यालयात परीक्षा संशोधन कार्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीसाठी अर्ज करता येणार आहे.
एवढा मिळणार पगार
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार 100 रूपये ते 1 लाख 77 हजार 500 रूपयांपर्यंत पगार मिळेल.
या पदासाठी योग्य निकषांवर आधारित मर्यादित उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील. मुलाखत 100 गुणांची असेल. ज्या उमेदवारांनी मुलाखतीत किमान 49 टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवले असतील त्यांचाच अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार आहे.
येथे करा अर्ज!
पात्र उमेदवारांनी आयोगाचे सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, 5 वा मजला, कोपरेज टेलिफोन कॉर्पोरेशन बिल्डिंग, महर्षी कर्वे मार्ग, कोपरेज मुंबई - 400 021 यांच्याकडे अर्ज पाठवावेत, अशी माहिती आयोगाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- India Post Recruitment 2022 : अल्पशिक्षित तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; प्रतिमाह 63000 पर्यंत मिळू शकतं वेतन
- Job Majha : टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज
- Infosys Recruitment : मोठी संधी! इन्फोसिसमध्ये होणार 55 हजार जणांची नोकर भरती, सीईओ सलील पारेख यांची माहिती
- Job Majha : वयाच्या साठीतही नोकरीची सुवर्णसंधी; दरमाह 5 लाखांपर्यंतचं वेतन, कसा कराल अर्ज?