एक्स्प्लोर

इंजीनियर झालेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी, NCL मध्ये विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?

इंजीनियर झालेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन ( NLC) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

NCL Recruitment 2024 : इंजीनियर झालेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन ( NLC) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. 

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC) भारतातील नवरत्न कंपन्यांपैकी एक आहे. ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (GET) या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत विविध तांत्रिक क्षेत्रातील एकूण 167 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

मेकॅनिकल : 84 पदे
इलेक्ट्रिकल: 48 पदे
सिव्हिल: 25 पदे
नियंत्रण आणि उपकरणे: 10 पदे

अर्जाची पात्रता आणि वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी असणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर OBC (NCL) प्रवर्गाला 3 वर्षांची व SC/ST प्रवर्गाला 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत दिली जाते. 1 डिसेंबर 2024 रोजी वयाची गणना केली जाईल.

अर्ज करण्याची फी किती?

अनारक्षित/ओबीसी (NCL)/EWS साठी:  854 रुपये
SC/ST/PWD/माजी सैनिकांसाठी: 354 रुपये

कसा कराल अर्ज? 

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना NLC च्या अधिकृत वेबसाइट www.nlcindia.in ला भेट द्यावी लागेल. येथे 'करिअर' विभागात जा आणि "ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनींची भर्ती (GETs)" या लिंकवर क्लिक करा. यानंतर, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. शेवटी, विहित शुल्क भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट सुरक्षित ठेवा. दरम्यान, नोकरीच्या शोधात असणाऱ्या इंजीनियरसाठी ही मोठी संधी आहे. www.nlcindia.in या साईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

NLC भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील

NLC इंडिया लिमिटेड ( NLC ) ही भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील नेवेली येथे आणि राजस्थान राज्यातील बिकानेर जिल्ह्यातील बारसिंगसर इथं ओपनकास्ट खाणींमधून दरवर्षी सुमारे 30 दशलक्ष टन लिग्नाइटचे उत्पादन होते. वीज निर्मितीसाठी 3640 मेगावॅट स्थापित क्षमतेच्या पिटहेडथर्मल पावर स्टेशनवर लिग्नाइटचा वापर केला जातो. त्याच्या संयुक्त उपक्रमामध्ये कोळशाचा वापर करून 1000 मेगावॅटचे थर्मल पॉवर स्टेशन आहे. अलीकडे, त्याने अक्षय ऊर्जा उत्पादनात विविधता आणली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

National Television Award ABP Majha | नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये ABP माझाचा डंकाNarendra Modi : काँग्रेस कुटुंबानं संविधानाला धक्का दिला इंदिरा गांधींच्या निर्णयांवर मोदींची टीकाOne Nation one election | एक देश एक निवडणूक! घटना दुरुस्तीत तरतुदी काय असतील? Special ReportSpecial Report One Nation One Election : एक देश एक निवडणूक! नव्या तरतुदी काय असतील?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन
दादांच्या राष्ट्रवादीतील पहिलं नाव समोर, नरहरी झिरवाळ यांना सुनील तटकरेंचा शपथविधीसाठी फोन
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
Embed widget