आयटीआयचं सर्टिफिकेट आहे? BARC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 266 पदांची भरती, लगेच करा अर्ज
BARC Mumbai Recruitment 2022 : BARC मुंबई ने स्टायपेंडरी ट्रेनी आणि सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोटीसनुसार, BARC मध्ये एकूण 266 रिक्त पदं काढण्यात आली आहेत.
BARC Mumbai Recruitment 2022 : डॉ होमी जहांगीर भाभा परमाणु संशोधन केंद्र म्हणजेच, भाभा अॅटॉमिक रिसर्च सेन्टर (BARC), मध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. त्यासाठी बीएआरसी मुंबईने स्टायपेंडरी ट्रेनी आणि साइंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन पदांवर भरती जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार, बार्कमध्ये एकूण 266 पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2022 आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारी अर्ज करण्यासाठी वेबसाइट http://www.barc.gov.in/ वर जाऊन अर्ज करु शकतात.
भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 1 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटचीची तारीख : 30 एप्रिल 2022
पदांची संख्या : 266
कोणत्या पदांसाठी भरती?
- स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरीसाठी 1 पदाची भरती
- केमिकल : 8
- केमिस्ट्री : 2
- सिव्हिल : 5
- इलेक्ट्रिकल : 13
- इलेक्ट्रॉनिक्स : 4
- इंस्ट्रूमेंशन : 7
- मॅकॅनिकल : 32
स्टायपेंड्री ट्रेनी कॅटेगरीसाठी 2 पदं
- एसी मॅकेनिक : 15
- इलेक्ट्रिशियन : 25
- इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक : 18
- फिटर : 66
- इंस्ट्रूमेंट मॅकेनिक : 13
- मशीनिस्ट : 11
- टर्नर : 4
- वेल्डर : 3
- ड्रॉफ्ट्समॅन मॅकेनिकल : 2
- लॅब असिस्टंट : 4
- प्लांट ऑपरेटर : 28
- सायंटिफिक असिस्टंट : 1 पद
- टेक्निशियन : 5 पद
वयोमर्यादा
श्रेणी I साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 24 वर्ष असावे. तर श्रेणी II साठी, उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 22 वर्ष असावं.
शैक्षणिक पात्रता
श्रेणी I साठी अर्ज करणार्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा आहे. श्रेणी II साठी उमेदवार किमान 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. तसेच, संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र. दुसरीकडे, वैज्ञानिक सहाय्यक (सुरक्षा) च्या पदांसाठी, किमान 50 टक्के गुणांसह अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा B.Sc असणे आवश्यक आहे आणि अधिक माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटवर जा आणि तपशील तपासा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Railway Recruitment 2022 : पश्चिम रेल्वेत मोठी भरती! थेट मुलाखतीतून होणार निवड, लवकरात लवकर अर्ज करा
- Railway Recruitment : पदवीधर किंवा 12वी पास असाल तर रेल्वेमध्ये अर्ज करा, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार
- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बंपर भरती; प्रतिमाह 1 लाख 75 हजार वेतन मिळवण्याची संधी
- SECL Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या कुठे करता येणार अर्ज