Railway Recruitment : पदवीधर किंवा 12वी पास असाल तर रेल्वेमध्ये अर्ज करा, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार
Railway Recruitment : या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 21 पदे भरण्यात येणार आहेत. जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार
Railway Recruitment : रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वेच्या अंतर्गत क्रीडा कोट्यातील 'गट क' च्या विविध भरतींच्या जाहीराती दिल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट ner.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज, २६ मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 21 पदे भरण्यात येणार आहेत.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख - 26 मार्च
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल
रिक्त जागा
एकूण पदांची संख्या- 21
पगार किती मिळेल?
लेवल - 2: ग्रेड पे रु 1900 आणि पे बँड रु 5200-20200
लेवल - 3: ग्रेड पे रु 2000 आणि पे बँड रु.5200-20200
लेवल - 4 : ग्रेड पे रु 2400 आणि पे बँड रु. 5200-20200
लेवल - 5: ग्रेड पे रु.28 आणि पे बँड रु.5200-20200
पात्रता
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित खेळात वरिष्ठ, युवा किंवा ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे.
वय किती असावे?
उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावे.
अर्ज फी
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक, बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD), महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची फी 250 रुपये आहे आणि सर्व उमेदवारांना 500 रुपये भरावे लागतील.
निवड प्रक्रिया
चाचणीमधील कामगिरी आणि क्रीडा आणि शैक्षणिक पात्रतेच्या मूल्यांकनाच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :