Railway Recruitment 2022 : पश्चिम रेल्वेत मोठी भरती! थेट मुलाखतीतून होणार निवड, लवकरात लवकर अर्ज करा
Mumbai Western Railway Recruitment 2022 : पश्चिम रेल्वे, मुंबई विभागाने प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि प्राथमिक शिक्षक (PRT) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
Mumbai Western Railway Recruitment 2022 : पश्चिम रेल्वे, मुंबई विभागानं प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि प्राथमिक शिक्षक (PRT) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सर्व पात्र उमेदवार पश्चिम रेल्वे भरती 2022 साठी आयोजित केलेल्या वॉक इन मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता रेल्वे माध्यमिक शाळा (इंग्रजी माध्यम), वलसाड गुजरात (वेस्ट यार्ड रेल्वे कॉलनी) येथे मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.
त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी नोंदणी करावी लागेल. विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह 6 एप्रिल ते 8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9:00 ते 12:00 या वेळेत मुलाखतीसाठी नोंदणी करावी लागेल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
या पदांसाठी भरती
अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेतून टीजीटी (हिंदी) साठी 1 पद, टीजीटी (गणित) साठी 1 पद, टीजीटी (विज्ञान) साठी 1 पद, टीजीटी (संस्कृत) साठी 1 पद, टीजीटी (सामाजिक विज्ञान) साठी 1 पद, टीजीटी (फिजिकल अँड हेल्थ एज्युकेशन) साठी 1 पद, टीजीटी (कम्प्युटर सायन्स) साठी 1 पद आणि असिस्टंट टीचर (प्रायमरी टीचर) या 4 रिक्त पदांसाठी भरती.
जाणून घ्या वेतन
TGT पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 26,250 रुपये आणि प्राथमिक शिक्षक पदांसाठी 21,250 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.
शैक्षणिक योग्यता
रेल्वे माध्यमिक विद्यालयातील प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाच्या पदांवरील भरतीसाठी, इच्छुक उमेदवारानी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित विषयांत पदवीधर पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच, उमेदवारांकडे शिक्षणाची पदवी किंवा पदविका असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Railway Recruitment : पदवीधर किंवा 12वी पास असाल तर रेल्वेमध्ये अर्ज करा, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार
- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बंपर भरती; प्रतिमाह 1 लाख 75 हजार वेतन मिळवण्याची संधी
- SECL Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या कुठे करता येणार अर्ज
- CSIR Jobs 2022 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये 'या' पदांसाठी रिक्त जागा; लवकरच अर्ज करा