फक्त मुलाखत द्या, स्टेट बँकेत नोकरी मिळवा, अर्ज करण्यासाठी उरले काही दिवस
बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
Bank Job News : बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 150 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत, पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 3 जानेवारी 2025 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2025 आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी (कोणत्याही शाखेतील) असणे आवश्यक आहे. यासह, उमेदवाराकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) द्वारे जारी केलेले फॉरेक्समधील प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र 31 डिसेंबर 2024 पर्यंत वैध असावे. दरम्यान, अर्ज करण्यासाठी काही दिवस उरले आहेत. त्यामुळं उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
कशी होणार निवड प्रक्रिया?
या भरतीच्या निवड प्रक्रियेत दोन मुख्य टप्पे असतील. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत. उमेदवार शॉर्टलिस्ट झाल्यानंतर, सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ही मुलाखत 100 गुणांचे असणार आहे. मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर बँक निर्णय घेईल आणि निवड केली जाईल. गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीच्या गुणांवर आधारित असणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असल्यास, त्या उमेदवारांना वयाच्या आधारावर क्रमवारी लावली जाईल, जिथे कमी वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्जासाठी शुल्क किती?
या भरतीसाठी अर्ज शुल्क सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी 750 रुपये आहे, तर SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क विनामूल्य आहे. उमेदवार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरू शकतात. .
कसा कराल अर्ज?
सर्व प्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जा.
मुख्यपृष्ठावर दिलेल्या करिअर लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर Current Openings या लिंकवर क्लिक करा.
आता SBI SCO Recruitment 2025 लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि नंतर लॉगिन करा.
अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.
अर्ज सबमिट करा आणि नंतर पृष्ठ डाउनलोड करा.
भविष्यातील वापरासाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.
महत्वाच्या बातम्या: