एक्स्प्लोर

अंगणवाडी सेविका भरतीसाठी शिक्षण किती असावे? वयाची मर्यादा काय? महत्त्वाच्या 15 अटी वाचा एका क्लिकवर!

Anganwadi Sevika Recruitment 2025 : राज्यात अंगणवाडी सेविका, आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे या योजनेच्या अटी काय आहेत, असे विचारले जात आहेत.

Maharashtra Anganwadi Sevika Recruitment 2025 : राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागान अंगणावाडी सेविक तसेच अंगणवाडी मदतीन पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 5639 अंगणवाडी सेविका पदांसाठी तसेच 13243  अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत? वयाची मर्यादा काय असावी? असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेच्या सर्व अटी जाणून घेऊ या... 

नियम आणि अटी काय?

 1. सोबतच्या विहीत नमुन्यातील अर्ज व त्यातील सर्व रकाने उमेदवाराने कागदपत्राच्या आधारे स्वतः भरावेत. अपूर्ण अर्ज, अपूर्ण माहिती लिहिलेला अर्ज रद्द ठरवून निकाली काढण्यात येईल. 

2. शैक्षणिक पात्रता व भाषेचे ज्ञानः अंगणवाडी मदतनीस या पदासाठी उमेदवार किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणीक पात्रता आवश्यक राहील या मध्ये शैक्षणिक अर्हते पैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असने आवश्यक आहे. उमेदवार 12 वी पेक्षा जास्त पदवी किवा पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करत आसल्यास या बाबतची गुणपत्रके, प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. तसेच ज्या अंगणवाडी केंद्रासाठी उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे अशा अंगणवाडी मध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरीक्त इतर भाषा बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडी मध्ये मदतनीस यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल.

3. वयाची अट:-अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा दि. 18/02/2025 रोजी किमान 18 व कमाल 35 वर्ष अशी राहील. तथापी विधवा उमेदवारासाठी ही वयोमर्यादा कमाल 40 वर्ष राहील.

4. वास्तव्याची (स्थानिक रहिवाशी असणे) अट : अर्जदार महिला संबधित ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/तांडा/वस्ती येथील स्थानिक रहिवाशी असावी.

5. लहान कुटुंब अटः अंगणवाडी मदतनीस या पदासाठी लहान कुटुबाची अट खालील प्रमाणे लागु राहील. 
    1. लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये.
    2. उमेदवारास दोन हयात अपत्ये पेक्षा अधीक अपत्य असल्यास उमेदवार पात्र ठरणार नाही.   
    3. अर्जदार महिला उमेदवारास लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडने आवश्यक आहे.

6. अंगणवाडी मदतनीस या पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवारास पंचायत राज संस्थांच्या जि.प.पं.स.ग्रा.पं. सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

7. अंगणवाडी सेविका/ अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज स्विकारणे विहित नमुन्यातील परीपूर्ण भरलेला अर्ज निश्चित केलेल्या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक / शासकिय सुटटीचे दिवस वगळून) स्वीकारले जातील. अर्जासोबत उमेदवाराची शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यक कागदपत्रे ही स्वयं साक्षांकित किंवा सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्रमाणित किंवा साक्षांकित केलेली असणे आवश्यक राहील.

8. अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस पद भरती संदर्भाने अंतिम निवडीपुर्वी केंद्र शासन राज्य शासनाने निवडीच्या निकषात वेळोवेळी केलेले बदल, सुधारणा उमेदवारावर बंधनकारक राहतील. पदभरती संदर्भाने समस्या निर्माण झाल्यास या वाबत शासन निर्देशानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल.

9. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा व प्रमाणपत्रांचाच विचार केला जाईल व त्या आधारेच शैक्षणिरक व इतर अर्हतेचे गुणांकन ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार गुणांकन यादी तयार केली जाईल. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत व त्याचा विचार केला जाणार नाही.

10. एका पदासाठी एकच अर्ज करावा लागेल.

11. जाहीर प्रगटनातील नमुद केलेले अंगणवाडी सेविका,  अंगणवाडी मदतनीस यांचे रिक्त पदे भरण्याबाबत ऐनवेळी काही अडचणी निर्माण झाल्यास याबाबत रिक्त 
पदे भरणे अथवा भरती प्रक्रिया रद करण्याबाबतचा अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे. पदाची संख्या कमी किंवा अधिक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

12. अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

13. विधवा व अनाथ उमेदवाराबाबत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधकारक राहील.

14. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस हे पद निवळ मानधनी तत्वावर आसल्याने शासनाचे लागू आसलेले लाभ (वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन इत्यादी) या पदास लागू राहणार नाहीत. 

15. अंगणवाडीच्या अनुभवासाठी फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

हेही वाचा :

अंगणवाडी सेविका भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार? सगळी यादी एका क्लिकवर; 7 व्या क्रमांकाचे कागदपत्र फार महत्त्वाचे!

मोठी बातमी : महिला बालविकास विभागाचा धमाका, तब्बल 18 हजार 882 पदं भरणार, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचाही समावेश!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, काहीही बोलण्याचा अधिकार आहे का? माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
Nashik Crime : धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 17 March 2025Harshwardhan Sapkal PC | मी काहीही चुकीचं म्हटलं नाही, त्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरणABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 17 March 2025Anish Shendge Join Shiv Sena | प्रकाश शेंडगे यांचे बंधू अनिश शेंडगेंचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, काहीही बोलण्याचा अधिकार आहे का? माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
Nashik Crime : धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
मोठी बातमी : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विधानभवनात दाखल, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विधानभवनात दाखल, नेमकं काय घडलं?
Aurangzeb Tomb Controversy : औरंगजेबच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचे कवच, वक्फ बोर्डाची जमीन अन् केंद्राची सुरक्षा! राज्य सरकारला कबर हटवणं शक्य आहे का?
औरंगजेबच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचे कवच, वक्फ बोर्डाची जमीन अन् केंद्राची सुरक्षा! राज्य सरकारला कबर हटवणं शक्य आहे का?
जयकुमार रावलांनी 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले, संजय राऊतांनंतर माजी आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले, संतोष देशमुखांसारखाच...
जयकुमार रावलांनी 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले, संजय राऊतांनंतर माजी आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले, संतोष देशमुखांसारखाच...
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
Embed widget