एक्स्प्लोर
इंटरनेटचा वापर करून चिमुकलींचं अनोखं रक्षाबंधन

1/5

अशाच प्रकारे अनेक बहिणींनी ऑनलाइन पद्धतीने आपल्या परदेशातील भावाला राखी बांधली.
2/5

सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात अलाहाबादमधील एका चिमुकलीनं अनोख्या पद्धतीनं आपल्या परदेशातील भावाला राखी बांधली. इंटरनेटचा वापर करून या चिमुकलीनं आपल्या परदेशातील भावाला ओवाळून औक्षण केलं. त्यानंतर तिने राखी बांधून आपल्या भावांकडून रक्षणाचं वचन घेतलं.
3/5

आजच्या रक्षाबंधनामध्ये भावा-बहिणीची ताटातुट होऊ नये, यासाठी तिच्या आई-वडिलांनी ऑनलाईन रक्षाबंधनाची व्यवस्था केली.
4/5

स्काईपच्या माध्यमातून वृंदाने आपल्या कुवैतमधील भावाचे औक्षण केलं. यानंतर तिचा भाऊ यशने वृंदाने पाठवलेली राखी आपल्या हातावर बांधली, आणि त्यानंतर तिच्यासाठी आणलेले गिफ्ट दाखवलं. हे गिफ्ट पाहून वृंदाचा आनंद गगनात मावत नव्हता.
5/5

अलाहबादमध्ये जन्मलेली चार वर्षीय वृंदा आपल्या आई-वडिलांसोबत कुवैतला गेली होती. मात्र, वृंदा आणि तिची आई या दोघी मायदेशी परतल्या. वृंदाच्या मोठ्या भाऊ यशला शाळेतून सुट्टी न मिळाल्याने तिच्या भावासोबत वडिलांना कुवैतमध्येच राहावं लागलं.
Published at : 18 Aug 2016 08:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
