Exclusive : सुशांतची डायरी माझाच्या हाती, सिगारेट सोडण्यापासून ते भविष्याबद्दल बरंच काही...
सुशांतच्या डायरीची ही पान पाहून हे स्पष्ट होत की, सुशांत आपल आयुष्य जगणं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असायचा.
मुंबई : सुशांतची डायरी माझाच्या हाती लागली आहे. या डायरीमध्ये सुशांत सिगारेट सोडण्यापासून ते आपल्या भविष्याबद्दल बोलतोय. तपास एजन्सीसाठी ही डायरी महत्वाची असल्याच सांगितलं जात आहे.
सुशांतला काय करायच आहे? ते या लिस्टमध्ये लिहले आहे. सहाव्या नंबर लिहलं आहे नो स्मोकिंग म्हणजेचं धूम्रपान करायच नाही. सुशांतच्या डायरीतील ही पानं त्याच फार्महाऊसमध्ये सापडली. जिथे सुशांत आणि रियावर पार्टीमध्ये ड्रग्स घेतल्याचा आरोप होत आहे.
सुशांतच्या फार्म हाऊसच्या तपासादरम्यान एनसीबीला सुशांतच्या डायरीतील काही पाने सापडली. ज्याच्यामध्ये एका पानावर 27 एप्रिल 2018 तारखेला नो स्मोकिंग असं लिहिलं होतं. सुशांतच्या डायरीची ही पान पाहून हे स्पष्ट होत की, सुशांत आपल आयुष्य जगणं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असायचा.अॅनालिसिस आणि एक्सपिरीयन्स म्हणजेचं विश्लेषण आणि अनुभव या दोन सिद्धांतांवर सुशांत आपलं आयुष्य जगायचा.
सुशांत नेहमी प्रयत्न करणारा आणि काहीतरी शिकत राहणारा व्यक्ती होता. निती आयोग पासून ते नासाच्या कार्यक्रम बद्दलची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता या डायरीच्या पानांमध्ये स्पष्ट दिसून येते.
या पानावर कबीर यांचा दोहा लिहला आहे.
जब मे था तब हरी नही जब हरि है मै नही..
आणि खाली मोमीनच शेर आहे.
तुम मेरे पास होते हो गया जब कोई दुसरा नही होता..
कबीरचा दोहा याचा अर्थ आहे की, अहंकारासोबत परमेश्वराची भेट होऊ शकत नाही आणि खाली मोमीनच शेर लिहिल आहे. सुशांतच्या डायरीतून हे दोहे आणि शेर सुशांत आयुष्याची फिलॉसॉफी कुठेतरी सांगत आहेत.
लोणावळ्याच्या ज्या फार्म हाऊस मधून ही डायरीची पानं सापडली. त्याठिकाणी सर्वात आधी 'एबीपी माझा' पोहचलं पवना जवळ असलेल्या फार्म हाऊस मध्ये सारा पासून रिया पर्यंत वर ड्रग्सच्या पार्टीचे आरोप लागले आहेत. सुशांतकडून मिळालेल्या डायरीच्या पानांवर सर्वात वर लिहिल आहे. सुशांत ड्रीम म्हणजे सुशांत स्वप्न 39/50 आणि खाली अंतरिक्ष विज्ञानाला घेऊन पूर्ण पोलीनेशियन थ्येरी लिहिली आहे.
अंतरिक्ष आणि विज्ञानाला घेऊन सुशांतच प्रेम कोणापासून लपलेलं नाही आहे. सुशांत अंतरिश विज्ञानाबद्दल अभ्यास करत होते आणि त्याला ते शिकायचं होतं सुशांतच स्वप्न होतं की, मुलांना सुद्धा याच शिक्षण द्याव. कबीरचे दोहे पासून पोलीनेशियन थेरीपर्यंत सुशांतची ऑल राउंड पर्सनॅलिटी बद्दल सांगत आहेत. अंतरिक्ष विज्ञान असो कबीरचे दोहे असो किंवा शायरी असो या सर्वांमधून सुशांत आयुष्य जगण्यासाठी काही प्रेरणा घ्यायचा ही डायरी तरी हेच सांगते.
सोशल मीडियावर सुशांत आपल्या स्वप्नात बद्दल आणि ते पूर्ण करण्यासंदर्भात लिहून पोस्ट करायचा. सुशांतच्या मृत्यूला घेऊन ड्रग्स संदर्भात एनसीबीकडून काही महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. जसा जसा हा तपास पुढे वाढत आहे तसा तसा रियाचा रोल यामध्ये मोठा होत चालला आहे.
संबंधित बातम्या :