ड्रग्जच्या रुपात सुशांतला स्लो पॉयझन, पर्दाफाश झालाच पाहिजे : रवी किशन
ड्रग्जच्या रुपात सुशांतला स्लो पॉयझन दिलं असं मला वाटतं. असं अभिनेते आणि खासदार रवी किशन म्हणाले. एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनवर भाष्य केलं.
नवी मुंबई : सुशांत सिंह राजपूतला ड्रग्जच्या रुपात विष दिलं आणि हे कारस्थान रचणाऱ्याचा चेहरा सगळ्यासमोर आलाच पाहिजे, असं वक्तव्य अभिनेते आणि भाजपचे खासदार रवी किशन यांनी केलं. ज्याप्रमाणे मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरु केलं, त्याप्रमाणे बॉलिवूडमध्येही स्वच्छ अभियान सुरु करायचं आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. अभिनेते रवी किशन एबीपी माझाशी मराठीत एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनवर भाष्य केलं.
बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनवरुन राज्यसभेत खासदार जया बच्चन आणि रवी किशन यांच्यात रंगलेला कलगीतुला सगळ्या देशाने पाहिला. जया बच्चन या माझ्यासाठी आईसारख्या आहेत. पण त्यांनी जे वक्तव्य केलं ते बरोबर वाटलं नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
"डाव्या विचारसणीचे लोक ड्रग्ज बॉलिवूडमध्ये घेऊन आले!" ते पुढे म्हणाले की, "काही छोटे मासे सर्व तलाव प्रदूषित करतात तसं आहे ड्रग्जच्या बाबतीत आहे. काही डाव्या विचारसरणीचे लोक ड्रग्ज बॉलिवूडमध्ये घेऊन आले आहेत. बॉलिवूडला कमजोर करणं हे त्यांचं कारस्थान आहे.
बॉलिवूडमध्येही स्वच्छता अभियान राबवायचंय मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरु केलं, त्याप्रमाणे बॉलिवूडमध्येही स्वच्छ अभियान सुरु करायचं आहे असं रवी किशन म्हणाले. "माझी लढाई केवळ ठराविक लोकांशी होती, कारण ते बॉलिवूडला बदनाम करत आहेत. देशभरात 12 इंडस्ट्री आहेत चित्रपटाच्या, केवळ बॉलिवूड नाही, मला त्या सर्वांची चिंता आहे. 2014 पासून पंतप्रधान मोदींनी सगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान सुरु केलं आहे. आम्ही तिच मोहीम बॉलिवूडमध्ये राबवतोय," असं त्यांनी त्यांनी सांगितलं.
'अभिषेक अचानक फासावर लटकल्याचं दिसून आलं तर?'; कंगना रनौतचा जया बच्चन यांच्यावर पलटवार
"मी इंडस्ट्रीत जवळून पाहिलं आहे हे कशा पद्धतीने होत आहे. वेळीच कारवाई नाही केली तर आमची पुढची पिढी बरबाद होईल. उडता पंजाब, संजू बनवला तर ते चालतं आणि मी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला की त्यावर मात्र हंगामा. भाजप हा राष्ट्रप्रेमी पक्ष आहे. आम्ही देशाच्या युवकांना बरबाद होऊ देणार नाही," असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
'ड्रग्जच्या रुपात सुशांतला स्लो पॉयझन दिलं' सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ड्रग्ज कनेक्शनपर्यंत आला. याविषयी विचारलं असता रवी किशन म्हणाले की, "ड्रग्जच्या रुपात सुशांतला स्लो पॉयझन दिलं असं मला वाटतं. मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत होतो, तो आयुष्य शोधत होता, मृत्यू नाही. त्याला ड्रग्ज कोणी त्याला पुरवलं? इतक्या सहजासहजी उपलब्ध होऊ दिलं हा कुणाचा प्लॅन आहे हे देशाला जाणून घ्यायचं आहे."
'काही लोकांमुळं संपूर्ण इंडस्ट्रीला खराब म्हणणं चुकीचं', हेमा मालिनींकडून जया बच्चन यांची पाठराखण
महाराष्ट्र विरुद्ध बिहार चित्र चुकीचं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देशात महाराष्ट्र विरुद्ध बिहार असं चित्र उभं राहिलं. परंतु या प्रकरणात महाराष्ट्र विरुद्ध बिहार चित्र जाणं बरोबर नाही, असं मत रवी किशन यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, "महाराष्ट्र बनवण्यात यूपी-बिहारच्या लोकांचंही मोठे योगदान आहे. मुंबईच्या विरोधात काही वक्तव्य करण्याचा तर मी विचारच करु शकत नाही. मुंबईनेच मला बनवलं आहे. मी पूर्ण मुंबईकर आहे, बांद्रा बॉय."
तसंच भोजपुरी सिनेमांच्या दर्जाबद्दल मी संसदेतही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याबद्दल सेन्सॉर बोर्ड बनवावं ही देखील माझी मागणी आहे, असंही रवी किशन यांनी सांगितलं.
Ravi Kishan : जया बच्चन आईसमान, मात्र त्यांचं वक्तव्य चुकीचं : रवी किशन