रश्मिका विजयची लगीनघाई, पंतप्रधानांनी दिल्या पत्र लिहित खास शुभेच्छा, पोस्ट व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या जोडीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Rashmika vijay wedding ceremony: फॅन्सची ‘श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. या खास सोहळ्यासाठी पंडितजी आधीच उदयपूरमध्ये पोहोचले असून दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यासह अनेक पाहुणे लेक सिटीत दाखल झाले आहेत. प्री-वेडिंग सेलिब्रेशनची जोरदार चर्चा सुरू असताना हळदी आणि संगीत समारंभाचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
मंगळवारी क्रिकेट मॅच आणि संगीत सोहळ्याने प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली. बुधवारी दिवसा हळदी तर संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या जोडीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संगीत आणि हळदीचे फोटो-व्हिडिओ व्हायरल
रश्मिका आणि विजयच्या संगीत सोहळ्याचे फोटो बुधवारी ऑनलाइन समोर आले. लाईट्स, ताज्या फुलांची सजावट आणि ग्रँड डेकोरेशनची झलक या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. एका चाहत्याने फोटो शेअर करत, “खूपच सुंदर क्षण,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या युजरने, “रश्मिका, आम्हाला अधिकृत फोटो पाहायचे आहेत,” अशी विनंती केली.

मंगळवारी रात्रीच्या संगीत कार्यक्रमातील एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात विजयची आई माधवी म्हणताना ऐकू येते, “हॅलो फ्रेंड्स… ही सुंदर सरप्राइज परफॉर्मन्स माझ्या प्रिय विजय आणि रुशीसाठी डेडिकेट करते. आम्ही तुम्हाला खूप प्रेम करतो.” या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.
लग्नाचा शुभ मुहूर्त कधी?
एका रिपोर्टनुसार, रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता सात फेरे घेणार आहेत. बुधवारी हळदी-मेहंदी झाल्यानंतर गुरुवारी दिवसा मुख्य विवाह सोहळा पार पडेल. प्री-वेडिंगची सुरुवात ‘विरोश प्रीमियर लीग’ गेम्स आणि संगीताने झाली होती.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
लग्नासाठी संदीप रेड्डी वांगा, आशिका रंगनाथ आणि राहुल रवींद्रन उदयपूरमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात आले होते; मात्र ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी पत्राद्वारे दोघांना शुभेच्छा दिल्या.
पत्रात त्यांनी लिहिले आहे की, “26 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या विजय आणि रश्मिकाच्या विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला. या अत्यंत आनंददायी आणि शुभ प्रसंगी देवरकोंडा आणि मंदाना कुटुंबीयांना हार्दिक अभिनंदन.”
ते पुढे म्हणाले की, हा त्यांच्या आयुष्यातील एका सुंदर नव्या अध्यायाची सुरुवात आहे. ‘सप्तपदी’च्या भावनेनुसार सात पावले एकत्र चालल्यानंतर दाम्पत्य आयुष्यभरासाठी मित्र बनते.
मोदी यांनी दोघांच्या फिल्मी प्रवासाचाही उल्लेख करत म्हटले की,
“विजय आणि रश्मिका पडद्यावर जादू निर्माण करण्यात तरबेज आहेत. मात्र त्यांच्या खऱ्या आयुष्यातील हा प्रेम आणि आपुलकीने भरलेला अध्याय त्यांनी पडद्यावर निर्माण केलेल्या जादूपेक्षाही अधिक उजळेल.”
Prime Minister @narendramodi extends wedding wishes to #VijayDevarakonda and #Rashmika pic.twitter.com/js86Nt8nih
— greatandhra (@greatandhranews) February 25, 2026
8 वर्षांच्या नात्याचा शेवट लग्नात
विजय आणि रश्मिका यांनी 2018 मध्ये ‘गीत गोविंदम’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर ‘डिअर कॉमरेड’ (2019) मध्येही त्यांची जोडी दिसली. याच काळात दोघे जवळ आले. सुरुवातीला त्यांनी नातं गुप्त ठेवले; मात्र चाहत्यांनी त्यांना ‘ViRosh’ नाव दिल्यानंतर चर्चा वाढली. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी गुपचूप साखरपुडा केला आणि आता 26 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नानंतर 3 मार्च रोजी हैदराबादमध्ये इंडस्ट्रीतील मित्रांसाठी रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे.
























