एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुरु असलेल्या मीडिया ट्रायलविरोधात हायकोर्टात आणखी एक याचिका

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुरु असलेल्या मीडिया ट्रायलविरोधात हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेचा निकाल लागेपर्यंत या प्रकरणाच्या वार्तांकनावर बंदीची मागणी करण्यात आली आहे.संवेदनशील प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून त्याच्या वार्तांकनाबाबत माध्यमांवर बंधनं लावण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका करण्यात आली आहे.

मुंबई : कोर्टाचा अवमान करण्याविषयीच्या कायद्याची व्याप्ती वाढवायला हवी का?, असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय विधी आयोगाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाप्रमाणे एखाद्या संवेदनशील प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून त्याच्या वार्तांकनाबाबत माध्यमांवर बंधनं लावण्याची मागणी करत हायकोर्टात एक नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. जोपर्यंत या याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील तपासाच्या वार्तांकनावर बंदी आणण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. सेवाभावी संस्था 'इन पर्स्युट ऑफ जस्टिस' च्यावतीने दाखल याचिकेवर मंगळवारी (15 सप्टेंबर) मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पडली.

केंद्रीय विधी आयोगाच्या 200 व्या अहवालातही यासंदर्भातील शिफारशी करण्यात आल्याचं यावेळी याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिलं. कोणत्याही संवेदनशील प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून त्याबाबत माध्यमांनी वार्तांकन करण्यावर काही मर्यादा असायला हव्या. जेणेकरुन न्याय व्यवस्थेचा अनादर होणार नाही, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात माध्यमांनी केलेल्या अतिरंजित वार्तांकनामुळे फ्रीडम ऑफ प्रेस आणि न्यायव्यवस्थेची प्रक्रिया यांच्यातील समतोल सांभाळण्यासाठी तातडीने काहीतरी उपाययोजना करण्याची विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे.

या प्रकरणी माध्यमांनी आरोपींना खुनी, अपहरणकर्ता, लुटारु अशा उपमा देत आधीच दोषी ठरवून टाकलं आहे. इतकंच काय तर तपासयंत्रणा, संबंधित हॉस्पिटलचा स्टाफ, साक्षीदार यांच्यावरही थेट आरोप करण्यात आलेत. त्यामुळे हे सारं कुठे तरी थांबायला हवं अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुरु असलेल्या मीडिया ट्रायलविरोधात इतर याचिकांसोबत पुढील महिन्यात 8 ऑक्टोबरला यावरही सुनावणी ठेवण्यात आली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: शेवाळे, निरुपम, अडसूळ, किर्तीकर...राज्यसभेची जागा 1, इच्छुक 8; एकनाथ शिंदे नेत्यांच्या गराड्यात अडकले!
शेवाळे, निरुपम, अडसूळ, किर्तीकर...राज्यसभेची जागा 1, इच्छुक 8; एकनाथ शिंदे नेत्यांच्या गराड्यात अडकले!
BMC : मुंबई महानगरपालिका प्रभाग समिती अध्यक्ष निवडणूक; कुठे बिनविरोध, कुठे थेट लढत? संपूर्ण चित्र स्पष्ट
मुंबई महानगरपालिका प्रभाग समिती अध्यक्ष निवडणूक; कुठे बिनविरोध, कुठे थेट लढत? संपूर्ण चित्र स्पष्ट

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget