Tiger Shroff : टायगर श्रॉफला पाहून बेशुद्ध पडली चाहती; नेटकरी म्हणाले, 'छोटी बच्ची हो क्या?'
'हीरोपंती-2' (Heropanti 2) या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी टायगर एका इव्हेंटमध्ये गेला होता.

Tiger Shroff : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या डान्सनं आणि फिटनेसनं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. लवकरच त्याचा 'हीरोपंती-2' (Heropanti 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि टायगर हे हीरोपंती-2 या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी तारा आणि टायगर हे एका इव्हेंटमध्ये गेले होते. या इव्हेंटमध्ये एक मुलगी टायगरला पाहण्यासाठी आली होती. यावेळी टायगरला पाहताच ती मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर त्यामुलीला पाणी देण्यात आले.
इव्हेंटमधील स्टाफ मेंबर्स त्या मुलीला पाणी देत होते तेव्हा ती मुलगी रडत होती. टायगरनं जेव्हा त्या मुलीकडे पाहिलं तेव्हा त्यानं तिला स्टेजवर बोलवलं. स्टेजवर ती मुलगी गेल्यावर टायगरनं तिला मिठी मारली. इव्हेंटमधील या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करून अनेकांनी त्या मुलीला ट्रोल केले आहे.
सध्या टायगरचा ‘छोटी बच्ची हो क्या?’हा डायलॉग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या डायलॉगचा वापर करून अनेक लोक मिम्स तयार करत आहेत. इव्हेंटमधील टायगरला पाहून बेशुद्ध पडलेल्या मुलीच्या व्हिडीओला ‘छोटी बच्ची हो क्या?’ अशी कमेंट करून अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
हीरोपंती-2 हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या हीरोपंती या चित्रपटाचा हा दुसरा पार्ट असणार आहे.
हेही वाचा :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Ankit Tiwari : ‘...त्यांच्यामुळे माझ्या 3 वर्षांच्या मुलीला उपाशी राहावं लागलं’, पंचतारांकित हॉटेलवर संतापला गायक अंकित तिवारी
- Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
