Thalapathy Vijay : साऊथ सुपरस्टार विजयनं 10 वर्षात एकही मुलाखत दिली नाही; सांगितलं 'हे' कारण
थलापती विजय (Thalapathy Vijay) च्या 'बीस्ट' (Beast)या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
Thalapathy Vijay : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय थलापती (Thalapathy Vijay) सध्या त्याच्या 'बीस्ट' (Beast) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. जवळपास 200 कोटींची कमाई या चित्रपटानं केली. 'बीस्ट' (Beast) चित्रपट रिलीज झाल्यानंतर विजयनं 10 वर्षानंतर पहिली मुलाखत दिली. विजयची ही मुलाखत दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी घेतली होती. या मुलाखतीमध्ये दहा वर्ष एकही मुलाखत न देण्याचं कारण देखील विजयनं सांगितलं.
मुलाखतीमध्ये विजयनं सांगितलं, 'मला सावध राहायचे होते. एका मुलाखतीमध्ये मी सांगितलेल्या गोष्टी वेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आल्या होत्या. माझ्या अनेक मित्रांनी मला प्रश्न विचारला की मुलाखतीत दिलेल्या उत्तरांमध्ये तुझा एरोगन्स का दिसतोय? मला ती मुलाखत आवडली नव्हती. त्या मुलाखतीबाबत माझ्या कुटुंबानं देखील मला विचारलं होतं. त्यामुळे मी सावध राहण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या जवळच्या व्यक्तींना हे समजावलं की मी सांगितलेल्या गोष्टी मुलाखतीमध्ये वेगळ्या पद्धतीनं दाखवल्या आहेत. त्यानंतर मी मुलाखत न देण्याचा निर्णय घेतला. '
विजयनं केलं होतं ट्वीट
दहा वर्षारपूर्वी विजयनं एका तमिळ मासिकासाठी मुलाखत दिली होती. विजयनं त्यावेळी ट्वीटरवर त्या मासिकासाठी दिलेल्या मुलाखतीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्या ट्वीटमध्ये विजयनं लिहिलं होतं की जर तुम्हाला तुमच्या मनाचे छापायचे असेल तर मुलाखत का घेतली?
विजयचे आगामी चित्रपट
विजय सध्या 'वरिसु' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटातून विजय तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वामशी पेडिपल्ली यांनी केली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटानंतर विजय दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या एका प्रोजेक्टवर काम करणार आहे.
हेही वाचा:
- MS Dhoni: धोनीची चित्रपट क्षेत्रात एन्ट्री! थालापथी विजयसोबत करणार पहिली फिल्म, लवकरच घोषणा
- Thalapathy Vijay Birthday : अभिनेत्री नाही तर फॅनसोबतच सुपरस्टार विजयनं बांधली लग्नगाठ; जाणून घ्या थलापती विजयची हटके लव्ह-स्टोरी