एक्स्प्लोर

MS Dhoni: धोनीची चित्रपट क्षेत्रात एन्ट्री! थालापथी विजयसोबत करणार पहिली फिल्म, लवकरच घोषणा

MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. मात्र, अजूनही त्याची फॅन फॉलोइंग थोडीशीही कमी झालेली नाही.

MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. मात्र, अजूनही त्याची फॅन फॉलोइंग थोडीशीही कमी झालेली नाही. धोनी सोशल मीडियावर सक्रीय नसतो. फावल्या वेळेत त्याला कुटुंब आणि मित्रांसह वेळ घालवायला आवडतं. आयपीएलमध्ये धोनी सध्या चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. आयपीएलचा पुढचा हंगाम धोनीसाठी शेवटचा असेल, अशी चर्चा आहे. यातच धोनी चित्रपट श्रेत्रात एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आलीय. थालापथी विजयसोबत तो पहिला चित्रपट करणार आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल, अशीही माहिती समोर आलीय. 

महेंद्रसिंह धोनीने स्वतः साऊथ सुपरस्टार विजयला फोन करून हा चित्रपट करण्यास सांगितलंय. अशा परिस्थितीत आता विजय हा चित्रपट करणार असल्याचे मानले जातंय. चेन्नई सुपर किंग्जसोबत एमएस धोनीचं नातं एक दशक जुनं आहे. त्यामुळं तो तामिळनाडूमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामुळंचं धोनीला थाला म्हणजेच नेता म्हटलं जातं. एमएस धोनीने काही काळापूर्वी त्याचं प्रोडक्शन हाऊस लॉन्च केलं होतं. ज्या अंतर्गत नुकतीच एक अॅनिमेशन मालिका देखील बनवण्यात आली. याआधी एमएस धोनीच्या आयुष्यावर बनलेल्या 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातही धोनीनं पैसे गुंतवल्याची माहिती समोर आली होती. 

धोनीची एकदिवसीय कारकीर्द
धोनीनं त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 10 हजार धावांचा टप्पा गाठलाय. त्यानं एकदिवसीय सामन्यात एकूण 350 सामने खेळले आहेत. यातील 297 डावात 50.57 च्या सरासरीनं 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 87.56 इतका होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 10 शतक आणि 73 अर्धशतकांची नोंद आहे. एवढेच नव्हेतर 84 वेळा नाबाद राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत तो तब्बल 10 वर्ष पहिल्या दहामध्ये होता.  

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
IND vs ENG 2nd ODI: कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदलताच क्रिकेटप्रेमींनी अंदाज बांधला
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget