Thalapathy Vijay Birthday : अभिनेत्री नाही तर फॅनसोबतच सुपरस्टार विजयनं बांधली लग्नगाठ; जाणून घ्या थलापती विजयची हटके लव्ह-स्टोरी
Thalapathy Vijay Birthday : अभिनेता विजयचं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे.
Thalapathy Vijay Birthday : आज अभिनेता विजय थलापतीचा (Thalapathy Vijay) 48 वा वाढदिवस आहेत. विजयचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला वाढदविसाच्या शुभेच्छा देत आहेत. विजयनं अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे वडील हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. अभिनेता विजयचं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. बालकलाकार म्हणून विजयनं चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नालया थीरपू' या चित्रपटामध्ये पहिल्यांदा लीड अभिनेता म्हणून त्यानं काम केलं. तेव्हा विजय 18 वर्षाचा होता.
विजय आणि संगीताची लव्ह स्टोरी
संगीता आणि विजयची लव्ह स्टोरी ही फिल्मी आहे. विजय त्याच्या एका चित्रपटाचे शूटिंग चेन्नई येथील फिल्मसिटीमध्ये करत होता. शूटिंगमध्ये ब्रेक मिळाल्यानंतर विजयला भेटायला संगीता गेली. संगीतानं त्यावेळी विजयला त्याच्या आगमी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विजय आणि संगीता यांच्यामध्ये मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विजयनं 25 ऑगस्ट 1999 रोजी संगीतासोबत लग्नगाठ बांधली. संगीता ही यूकेमध्ये रहात होती. ती विजयची फॅन होती. संगीता ही श्रीलंकेच्या उद्योगपतींची मुलगी आहे.
विजयनं प्रियांका चोप्रा, श्रीदेवी यांसारख्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. thamizhan या तमिळ चित्रपटामध्ये प्रियांकासोबत विजयनं काम केलं. ही चित्रपट 2002 मध्ये रिलीज झालं. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या Poove Unakkaga या चित्रपटामुळे विजयला विशेष लोकप्रियता मिळाली. 'वरिसु - द बॉस रिटर्न्स' हा विजयचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये थलापती विजय आणि रश्मिका मंदानाची जोडी पाहायला मिळणार आहे. विजयच्या बीस्ट चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाच्या ट्रेलरचं शाहरूखनं कौतुक केलं होतं. शाहरुखनं ट्वीट शेअर करून लिहिले होते, 'मी दिग्दर्शक एटलीसोबत बसून बीस्टचा ट्रेलर पाहिला. ते देखील माझ्यासारखेच विजयचे फॅन आहेत. बीस्टच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. हा ट्रेलर मीनर, लीनर आणि स्ट्रॉन्गर दिसत आहे. ' विजयच्या आगामी चित्रपटांची वाट त्याचे चाहते उत्सुकतेने बघत असतात.
हेही वाचा:
- Beast: शहारूख थलापती विजयचा जबरा फॅन; बीस्टचा ट्रेलर पाहिल्यानंतर म्हणाला...
- Varisu First Look Out : थलापती विजयच्या आगामी 'वरिसु' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज