एक्स्प्लोर

Telly Masala :  'पारू'तील दृष्यावर झी मराठीवर महिला प्रेक्षक संतापल्या ते वडिलांच्या वागण्याला वैतागून टोकाचा निर्णय घेतलाही होता पण...जॉनी लिव्हरने सांगितल्या कटू आठवणी;  जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Paru Zee Marathi Serial : सारखं काय कानाखाली मारताना दाखवताय; 'पारू'तील दृष्यावर झी मराठीवर महिला प्रेक्षक संतापल्या

 टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा अव्वल येण्यासाठी  'झी मराठी'ने (Zee Marathi) कंबर कसली आहे. 'झी मराठी'वर दोन नव्या मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये  'पारू' (Paru) आणि 'शिवा' या दोन मालिकांचे प्रसारण सुरू झाले आहे. या मालिकांना संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पारु मालिकेच्या दृष्यावर लोक संतापले आहेत.  अहिल्यादेवींकडून पारूला सारखी मारहाण होत असल्याचे दृष्य दाखवत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Jhony Lever : वडिलांना वागण्याला वैतागून टोकाचा निर्णय घेतलाही होता पण, बहिणींनी...; जॉनी लिव्हरने सांगितल्या कटू आठवणी

बॉलीवूडमधील (Bollywood) दिग्गज अभिनेते आणि विनोदवीर जॉनी लिव्हर (Jhony Lever ) यांची संपूर्ण सिनेसृष्टीतली ओळख ही लोकांना हसवण्यासाठी म्हणून आहे. पण याच विनोदवीराच्या आयुष्यातला वाईट काळ देखील तितकाच वेदनादायी आहे. जॉनी लिव्हर यांनी 1980 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण करत अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं. बाजीगर, राजा हिंदुस्तानी, दुल्हे राजा, बादशाह, आमदनी अट्ठानी खर्चा रुपैया, खट्टा मीठा, गोलमाल, दे दना दन अशा अनेक चित्रपटांमधून जॉनी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Lakshmichya Pavalani : चांदेकरांच्या घरात कलाला भोगावी लागणार नयनाच्या वागण्याची शिक्षा, लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेचा महाएपिसोड 

 काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर सुरु झालेल्या 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Lakshmichya Pavalani) मालिका ही सध्या रंजक वळणावर आहे. चांदेकरांच्या घरात नयना ऐवजी कलाने गृहप्रेवश केला असला तरीही चांदेकरांनी मात्र अजूनही कलाला स्विकारलं नाही आहे. त्यामुळे चांदेकरांच्या घरात कलाला नयनाच्या वागण्याची शिक्षा भोगावी लागणार असल्याचं पाहायला मिळतंय. रविवार 18 फेब्रुवारी रोजी या मालिकेचा महाएपिसोड प्रदर्शित करण्यात येणार आहे.

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा 

Bhagya Dile Tu Mala : कावेरी आणि राजवर्धनच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल, पण किमयामुळे नात्याला नवं वळण येणार? मालिका रंजक वळणावर 

 कलर्स मराठी (Colours Marathi) वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile tu Mala) या मालिकेत आता एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. कावेरी गरोदर असून लवकरच कावेरी आणि राजवर्धन आईबाबा होणार आहेत. मालिकेचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलाय. त्यामुळे मालिकेला देखील आता पुन्हा एकदा रंजक वळण मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.  तसेच रविवार 18 फेब्रुवारी रोजी या मालिकेचा दोन तांसांचा विशेष भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Kailash Waghmare : ज्याचे तुम्ही फॅन असता, तीच व्यक्ती फोटोसाठी आग्रह करते, तेव्हा...; मराठी अभिनेत्यानं सांगितला खास अनुभव

अनेकदा आपल्या आवडत्या कलाकारांसोबत एक फोटो, सेल्फी काढून ती आठवण सोबत ठेवण्याचा प्रयत्न चाहते करतात. मात्र, ज्याचे तुम्ही फॅन असता, तीच व्यक्ती फोटोसाठी आग्रह धरते तेव्हा तुम्हाला आकाश ठेंगणे होते.  असाच अनुभव मराठी अभिनेता कैलास वाघमारेला (Kailas Waghmare) आला. पृथ्वी थिएटरमधील प्रयोग संपल्यानंतर कैलास वाघमारे ज्याचा चाहता त्यानेच स्वत:हून त्याचे कौतुक करत त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रह धरला. कैलास वाघमारेने हा किस्सा शेअर केला आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Rahul Deshpande : गायक राहुल देशपांडे दिसणार रोमँटीक भूमिकेत, लवकरच झळकरणार मोठ्या पडद्यावर, नव्या सिनेमाचा प्रोमो रिलीज

गायक राहुल देशपांडेचा (Rahul Deshpande) 'अमलताश' (Amaltash) हा नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात राहुल देशपांडे हा रोमँटीक भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये नवी स्टारकास्ट असल्याचं देखील राहुल देशपांडेने सांगितली आहे. पंडीत वसंतराव देशपांडे (Vasantrao Deshpande) यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपटानंतर राहुल देशपांडे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकरणार आहे. या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Shivrayancha Chhava : 400 पेक्षा जास्त थिएटर्स अन् 1200 पेक्षा जास्त शोज्, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' आजपासून सिनेमागृहात

'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj), 'सुभेदार' (Subhedar)  या दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटांनंतर आता 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजपासून म्हणजे 16 फेब्रुवारीपासून सिनेमागृहात हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक गोष्ट या सिनेमाची आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget