![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bhagya Dile Tu Mala : कावेरी आणि राजवर्धनच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल, पण किमयामुळे नात्याला नवं वळण येणार? मालिका रंजक वळणावर
Bhagya Dile Tu Mala : भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरी आणि राजवर्धन आता आईबाबा होणार आहेत. या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
![Bhagya Dile Tu Mala : कावेरी आणि राजवर्धनच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल, पण किमयामुळे नात्याला नवं वळण येणार? मालिका रंजक वळणावर Bhagya Dile Tu Mala Colours Marathi serial Kaveri becomes mother soon what will be the Rajvardhan reaction after getting the news detail marathi news Bhagya Dile Tu Mala : कावेरी आणि राजवर्धनच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल, पण किमयामुळे नात्याला नवं वळण येणार? मालिका रंजक वळणावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/16/3584953b11872dd45632893ae5ad9b971708051831351720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhagya Dile Tu Mala : कलर्स मराठी (Colours Marathi) वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile tu Mala) या मालिकेत आता एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. कावेरी गरोदर असून लवकरच कावेरी आणि राजवर्धन आईबाबा होणार आहेत. मालिकेचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलाय. त्यामुळे मालिकेला देखील आता पुन्हा एकदा रंजक वळण मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच रविवार 18 फेब्रुवारी रोजी या मालिकेचा दोन तांसांचा विशेष भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे.
राज आणि कावेरी यांच्या आयुष्यात अनेक वादळं आलीत. ज्यावर त्या दोघांनी मिळून मात केली. आता त्यांच्या आयुष्यात किमया नावाची व्यक्ती आहे. किमया ही राजवर्धनची बॉस दाखवण्यात आली आहे. तसेच ती कावेरी आणि राजवर्धनची मैत्रीण देखील आहे. पण या किमयामुळे राजवर्धन आणि कावेरीच्या आयुष्यात नवं वादळ येणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
प्रोमोमध्ये नेमकं काय?
मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये कावेरीला ती गरोदर असल्याचं डॉक्टरांकडून समजतं. त्यावेळी सर्वात आधी तिला ही गोष्ट राजवर्धनला सांगायची असते. त्यासाठी ती राजवर्धनला फोन देखील लावते. पण राजवर्धनचा फोन बंद येतो. त्यावेळी राजवर्धन त्याचा फोन बंद करुन किमयाच्या हातात देतो. त्यामुळे आता राजवर्धनला त्याच्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची गोष्ट कशी कळणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
कावेरीला तिच्या आणि राजवर्धनच्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा राजवर्धनला सांगायची असते. पण किमयामुळे राजवर्धनपर्यंत ही बातमी पोहचणार का? किमया राजवर्धनला ही बातमी कळू देणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या दोन तासांच्या विशेष भागामध्ये मिळतील. तसेच आता या किमायमुळे मोहितेंच्या घरात कोणतं नवं संकट येणार आणि त्यावर राजवर्धन आणि कावेरी कशी मात करणार कि राजवर्धन आणि कावेरीच्याच नात्याची परीक्षा घेतली जाणार हे सगळं मालिकेच्या येत्या भागांमधून स्पष्ट होईल.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)