एक्स्प्लोर

Lakshmichya Pavalani : चांदेकरांच्या घरात कलाला भोगावी लागणार नयनाच्या वागण्याची शिक्षा, लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेचा महाएपिसोड 

Lakshmichya Pavalani : चांदेकरांच्या घरात गृहप्रवेश करताच कलाला नयनाच्या वागणुकीमुळे बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय.

Lakshmichya Pavalani :  काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर सुरु झालेल्या 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Lakshmichya Pavalani) मालिका ही सध्या रंजक वळणावर आहे. चांदेकरांच्या घरात नयना ऐवजी कलाने गृहप्रेवश केला असला तरीही चांदेकरांनी मात्र अजूनही कलाला स्विकारलं नाही आहे. त्यामुळे चांदेकरांच्या घरात कलाला नयनाच्या वागण्याची शिक्षा भोगावी लागणार असल्याचं पाहायला मिळतंय. रविवार 18 फेब्रुवारी रोजी या मालिकेचा महाएपिसोड प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

अद्वैत चांदेकरचं नयनाशी लग्न ठरतं. पण अद्वैतचा भाऊ राहुल याच्यासोबत नयना ही लग्नाच्या दिवशीच पळून जाते. त्यावेळी नयनाची आई कलाला मांडवात उभी करते. लग्नमंडपातच अद्वैतला कलाचं सत्य कळतं पण चांदेकरांच्या इब्रतीसाठी अद्वैत आणि कलाचं लग्न होतं. पण चांदेकरांच्या घरामध्ये कलाला तिचं स्थान प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

मालिकेचा नवा प्रोमो

दरम्यान या मालिकेचा महाएपिसोड रविवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याआधी मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये अद्वैत नयनाच्या सगळ्या आठवणी जाळून टाकतो. तसेच यापुढे कधीही प्रेमात पडणार नसल्याचं देखील अद्वैत म्हणतो. तर सरोज या सगळ्यासाठी कलाला जबाबदार धरते आणि तिला कधीही माफ करणार नसल्याचं तिला स्पष्ट सांगते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेची स्टार कास्ट

अक्षर कोठारी,  ईशा केसकर,  दिपाली पानसरे आणि किशोरी आंबिये हे कलाकार लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अभिनेत्री इशा केसकर ही "लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत  कला खरे ही भूमिका साकारत आहे.

'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Lakshmichya Pavalani) मालिका ही अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तीन बहिणी आणि त्यांच्या आईची मुलींच्या लग्नासाठी सुरु असलेली धडपड असा सर्वसाधारणपणे आशय आणि गोष्ट या मालिकेची आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून अद्वैत आणि कलाच्या लग्नाची धूम प्रेक्षकांना पाहायला मिळत होती. 

ही बातमी वाचा : 

Bhagya Dile Tu Mala : कावेरी आणि राजवर्धनच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल, पण किमयामुळे नात्याला नवं वळण येणार? मालिका रंजक वळणावर 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी' अंतिम टप्प्यावर, Top 5 स्पर्धकांची नावं समोर; बॉटम 2 स्पर्धक कोण? कुणाचा प्रवास संपणार?
'बिग बॉस मराठी' अंतिम टप्प्यावर, Top 5 स्पर्धकांची नावं समोर; बॉटम 2 स्पर्धक कोण? कुणाचा प्रवास संपणार?
Aarya Ambekar: आर्या आंबेकरचा मालिकेतून सुरेल प्रवास, सांगितला ‘कमळी’ टीमसोबतचा खास अनुभव; म्हणाली..
आर्या आंबेकरचा मालिकेतून सुरेल प्रवास, सांगितला ‘कमळी’ टीमसोबतचा खास अनुभव; म्हणाली..
Zee Marathi Serial: झी मराठीची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी! ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ मधून एक्स्ट्रा मनोरंजन
झी मराठीची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी! ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ मधून एक्स्ट्रा मनोरंजन
Kamali Marathi TV Serial: कमळी-ऋषीच्या नात्यात नवा ट्विस्ट; 'अनामिका'च्या एन्ट्रीमुळे घडणार मोठा बदल, गोड गळ्याच्या 'या' अभिनेत्रीची एन्ट्री
कमळी-ऋषीच्या नात्यात नवा ट्विस्ट; 'अनामिका'च्या एन्ट्रीमुळे घडणार मोठा बदल, 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
Embed widget