(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paru Zee Marathi Serial : सारखं काय कानाखाली मारताना दाखवताय; 'पारू'तील दृष्यावर झी मराठीवर महिला प्रेक्षक संतापल्या
Paru Zee Marathi Serial : पारु मालिकेच्या दृष्यावर लोक संतापले आहेत. अहिल्यादेवींकडून पारूला सारखी मारहाण होत असल्याचे दृष्य दाखवत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Paru Zee Marathi Serial : टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा अव्वल येण्यासाठी 'झी मराठी'ने (Zee Marathi) कंबर कसली आहे. 'झी मराठी'वर दोन नव्या मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये 'पारू' (Paru) आणि 'शिवा' या दोन मालिकांचे प्रसारण सुरू झाले आहे. या मालिकांना संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पारु मालिकेच्या दृष्यावर लोक संतापले आहेत. अहिल्यादेवींकडून पारूला सारखी मारहाण होत असल्याचे दृष्य दाखवत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'झी मराठी'वर 12 फेब्रुवारीपासून पारु आणि शिवा या दोन मालिका सुरू झाल्या आहेत. पारू' या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत शरयू सोनावणे आहे. तर, अहिल्यादेवींच्या भूमिकेत मुग्धा कर्णिक आहेत. अभिनेता प्रसाद जवादेही या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. शिस्तबद्ध, वचनाची पक्की, रागीट अशा अहिल्यादेवीच्या महालासारख्या बंगल्यात मनसोक्त जगणाऱ्या पारुची एन्ट्री झाली आहे. पारू ही अहिल्यादेवींच्या बंगल्यात मदतनीस म्हणूम काम करत आहे. अहिल्यादेवी आणि पारुमध्ये संघर्ष होताना दिसत आहे.
View this post on Instagram
महिला प्रेक्षक संतापल्या...
झी मराठीने लाँच केलेल्या 'पारु'च्या नव्या प्रोमोमध्ये अहिल्यादेवींना संकटातून वाचवण्यासाठी पारू पळत जात स्टेज जात असते. मात्र, तिच्यामुळे पोट्रेट जळते आणि आदित्य संतापून कानाखाली मारतो. पारूला कानाखाली मारताना का दाखवताय असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे. एका प्रेक्षकाने म्हटले की, हा कोणत्या प्रकारचा माज आहे. हे काय दाखवताय तुम्ही, सतत कोणीतरी कानाखाली मारतंय हे किती वाईट दिसतंय असे एकाने म्हटले.
तर, आणखी एका महिला प्रेक्षकाने आधी मालिकेची जाहिरात यायची तेव्हा किती छान वाटायचं. पण आता हे सारखं कानाखाली मारताय? कारच्या दरवाज्यात पदर अडकला तरी अहिल्यादेवींनी पारूच्या कानाखाली मारली, हे काही बरं नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
पहिल्या पाच एपिसोडमध्येच एक लीड अॅक्ट्रेस दुसऱ्या लीड अॅक्ट्रेसला मारहाण करत असल्याचे दाखवले जातंय, व्वा अशी उपरोधिक प्रतिक्रिया आणखी एका महिला प्रेक्षकाने व्यक्त केली.
पुन्हा कर्तव्य आहे' , 'झी मराठी'वर सुरु होणार नवी गोष्ट
'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवर 'पुन्हा कर्तव्य आहे' (Puna Kartvya Ahe) ही नवी मालिका लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेत अभिनेता अक्षय म्हात्रे (Akshay Mhatre) आणि अक्षया हिंदळकर(Akshaya Hindalkar) ही नवी कोरी जोडी झळकणार आहे. दरम्यान ही मालिका झी टीव्हीवरील एका हिंदी मालिकेचा रिमेक असून पुन्हा लग्न करण्याच्या संकल्पनेवर आधारित या मालिकेची गोष्ट आहे. नुकताच वाहिनीकडून या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.