Shivrayancha Chhava : 400 पेक्षा जास्त थिएटर्स अन् 1200 पेक्षा जास्त शोज्, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' आजपासून सिनेमागृहात
Shivrayancha Chhava : पुन्हा एका दिग्पाल लांजेकर यांची एक ऐतिहासिक कलाकृती मोठ्या पडद्यावर आली आहे. 'शिवरायांचा छावा' हा चित्रपट आज प्रदर्शित करण्यात आला आहे.
Shivrayancha Chhava : 'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj), 'सुभेदार' (Subhedar) या दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटांनंतर आता 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजपासून म्हणजे 16 फेब्रुवारीपासून सिनेमागृहात हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक गोष्ट या सिनेमाची आहे.
दिग्पाल लांजेकर यांचा सुभेदार हा चित्रपट मागील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या सिनेमावर देखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. आता पुन्हा एका दिग्पाल लांजेकर यांची एक ऐतिहासिक कलाकृती मोठ्या पडद्यावर आली आहे. दरम्यान या सिनेमाला 400 पेक्षा जास्त थिएटर्स आणि 1200 पेक्षा जास्त शोज् मिळाले असल्याचं देखील दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलं आहे.
View this post on Instagram
'हा' अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका
शिवरायांचा छावा या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. हे पोस्टर पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला होता की, "शिवरायांचा छावा" या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार? आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. दिग्दपाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर "शिवरायांचा छावा" या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अभिनेता भूषण पाटील हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे.
"सिंहासनी बैसले शंभू राजे" गीताचा सोशल मीडियावर धुमाकूळ
छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या कारकिर्दीत दाखवलेले शौर्य आणि दिलेले योगदान लक्षणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी राजे यांनी अडचणीच्या काळात मराठा साम्राज्य ताब्यात घेतले. संभाजी महाराजांनी 16 जानेवारी 1681 रोजी आपला राज्याभिषेक केला.
छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा भव्य आणि उत्साहात साजरा करण्यात आला होता. हाच स्वराज्याचा दुसरा देदिप्यमान आणि भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवायचा असेल तर छत्रपती संभाजी महाराजांवरील 'शिवरायांचा छावा' या मराठीतल्या पहिल्या भव्य सिनेमातील राज्याभिषेकावरील प्रदर्शित झालेल्या गीतातून याची झलक पाहायला मिळत आहे.