(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Deshpande : गायक राहुल देशपांडे दिसणार रोमँटीक भूमिकेत, लवकरच झळकरणार मोठ्या पडद्यावर, नव्या सिनेमाचा प्रोमो रिलीज
Rahul Deshpande : गायक राहुल देशापांडेच्या नव्या सिनेमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. तसेच 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Rahul Deshpande New Movie : गायक राहुल देशपांडेचा (Rahul Deshpande) 'अमलताश' (Amaltash) हा नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात राहुल देशपांडे हा रोमँटीक भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये नवी स्टारकास्ट असल्याचं देखील राहुल देशपांडेने सांगितली आहे. पंडीत वसंतराव देशपांडे (Vasantrao Deshpande) यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपटानंतर राहुल देशपांडे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकरणार आहे. या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेसह राहुल देशपांडेने दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन सुहास देसले यांनी केलंय. राहुल देशपांडेसह या चित्रपटामध्ये पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटामधून प्रेक्षकांना संगीताची देखील पर्वणी मिळणार आहे.
View this post on Instagram
जितेंद्र जोशीची निर्मिती
मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे यांची निर्मिती असून अभिनेता जितेंद्र जोशी याने देखील या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक संगीतमय प्रवासाची पर्वणी मिळणार आहे. तसेच या सिनेमाची गोष्ट देखील संगीतावर आधारित आहे.
या चित्रपटच्या माध्यमातून अनेक नवे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रोमोच्या शेवटी राहुल देशपांडेने या चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, मला माझ्या कामामुळे या चित्रपटाचे प्रमोशन करता आले नाही. पण तुम्ही तुमच्या माध्यमातून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. खूप मनापासून केलेला हा चित्रपट आहे. पण तुम्हाला आवडेल असा हा चित्रपट आहे. हे आमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं काम आहे. जे अखेर साकार होतंय. तसेच यावेळी राहुल देशपांडेने प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याची विनंती देखील केलीये.