एक्स्प्लोर

लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? ते बिग बॉस मराठीने रचला विक्रम; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly masala : मालिका आणि सिने विश्वात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात आणि त्या जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता असते. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!


Ankita Lokhande Pregnancy :  बिग बॉस 17 (Bigg Boss 17)च्या सीजनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे जोडपं सर्वात जास्त चर्चेत आलं होतं. त्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती. लग्नाच्या तीन वर्षानंतर आता अंकिताकडे गुड न्यूज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Birthday : डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''


Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Birthday : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) आता रंगू लागला आहे. घरातील सदस्यांमध्ये टास्कच्या दरम्यान ठस्सन दिसून येते. इतरवेळी मात्र घरातील सदस्य खेळीमेळीच्या वातावरणात असल्याचे दिसते. घरातील सदस्यांचे वाढदिवसही साजरे होत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्की तांबोळीचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. आजच्या भागात घरातील सदस्य कॅप्टन निक्कीचा वाढदिवस साजरा करताना दिसणार आहेत. निक्कीच्या वाढदिवसानिमित्त धनंजय पोवार अर्थात डीपी दादांनी (Dhananjay Powar) खास आपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Ban On OTT Adult Content :  ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर बंदी घाला अन्यथा...; मनसेचा सरकारला इशारा


Ban On OTT Adult Content :  राज्यासह देशात  महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवली जाणारी अश्लीलता महिला अत्याचारांना आणि विकृती पसरवण्यास जबाबदार असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या बाबत मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. अन्यथा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कार्यालयांना घेराव घालण्याचा इशाराही जाधव यांनी दिल आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

 


Marathi Serial Updates Sunil Barve : ''नरसिंहराव' यांचे झी मराठीवर 11 वर्षानंतर कमबॅक; सुनील बर्वेंची 'पारू' मालिकेत एन्ट्री

Marathi Serial Sunil Barve :  अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) हे तब्बल 11 वर्षानंतर 'झी मराठी'वर (Zee Marathi) कमबॅक करत आहेत.  सुनील बर्वे यांनी झी मराठीवरील 'कुंकू' मालिकेत नरसिंहराव यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर सुनील बर्वे हे पारू मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत सुनील बर्वे हे सयाजीराव ही भूमिका साकारणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Marathi Serial Updates Durga : सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Serial Updates Durga : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी जोरदार प्रयत्न मराठी वाहिन्यांकडून सुरू आहेत. त्याच अनुषंगाने प्रेक्षकांच्या भेटीसाठी नवीन मालिका येत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरही आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर, दुसरीकडे जून महिन्यात सुरू झालेली मालिका 'अंतरपाट' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अंतरपाट मालिकेच्या वेळेवर आता दु्र्गा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Bigg Boss Marathi : रितेश 'भाऊचा धक्का'! 'बिग बॉस मराठी'ने रचला नवा विक्रम, टीआरपीची यशस्वी घोडदौड

Bigg Boss Marathi Season 5 : कलर्स मराठी' वाहिनीवर 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi new Season) नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला.  या सीझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला आहे. नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरत आहेत. ग्रँड प्रीमियरपासून सुरू झालेली 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special ReportWare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget