एक्स्प्लोर

Ban On OTT Adult Content :  ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर बंदी घाला अन्यथा...; मनसेचा सरकारला इशारा

Ban On OTT Adult Content :  ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवली जाणारी अश्लीलता महिला अत्याचारांना आणि विकृती पसरवण्यास जबाबदार असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे

Ban On OTT Adult Content :  राज्यासह देशात  महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवली जाणारी अश्लीलता महिला अत्याचारांना आणि विकृती पसरवण्यास जबाबदार असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या बाबत मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. अन्यथा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कार्यालयांना घेराव घालण्याचा इशाराही जाधव यांनी दिल आहे.

लहान मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये विकृती निर्माण होत आहे ती या अश्लील कंटेंट मुळे होत आहे... त्यामुळे लोकभावना आणि पालकांची मागणी आहे यावरील हा अश्लील कंटेंटवर सेन्सॉर लावला पाहिजे, असं मत अविनाश जाधव  आणि महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सादरीकरण स्वातंत्र्यांच्या नावाखाली अश्लील, विभत्स आणि मर्यादा ओलांडणारी दृष्ये दाखवली जात असून ती संतापजनक असल्याचे अविनाश जाधव यांनी  आपल्या निवेदनात म्हटले आहे. कुटुंबाने एकत्रित बसून बघण्यासारखी एकही कलाकृती सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नसल्याचे जाधव यांनी म्हटले. भावी पिढीवरील संस्कार मोडीत काढण्याचे षडयंत्र काही ठाराविक निर्मिती संस्था, निर्माते आणि वाहिन्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय संस्कृती रसातळाला नेण्याचा कुटील डाव परकीय खेळत आहे का, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 
 
ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर अन्यथा...

विषयाचे गांभीर्य समजून तात्काळ नेटफ्लिक्स , प्राईम टाईम, हॉट स्टार, आल्ट बालाजी यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कडक निर्बंध आणण्याची मागणी मनसेने केली आहे. ओटीटी वरील अश्लील वेब सीरीजवर सरकारने बंदी न घातल्यास नेटफ्लिक्स,बालाजी सारख्या प्रोडक्शन हाऊसच्या  कार्यालयांवर  घेराव घालण्याचा इशारा मनसेने दिला आहे. 

दरम्यान, याआधी देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटबाबत अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मालिका, चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड असावा अशी मागणी करण्यात आली होती. काही महिन्यापूर्वीच  बिग बॉस ओटीटीवरील कंटेंटवरूनही वाद निर्माण झाला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्लाSadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Embed widget