Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Birthday : डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Birthday : निक्कीच्या वाढदिवसानिमित्त धनंजय पोवार अर्थात डीपी दादांनी खास आपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Birthday : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) आता रंगू लागला आहे. घरातील सदस्यांमध्ये टास्कच्या दरम्यान ठस्सन दिसून येते. इतरवेळी मात्र घरातील सदस्य खेळीमेळीच्या वातावरणात असल्याचे दिसते. घरातील सदस्यांचे वाढदिवसही साजरे होत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्की तांबोळीचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. आजच्या भागात घरातील सदस्य कॅप्टन निक्कीचा वाढदिवस साजरा करताना दिसणार आहेत. निक्कीच्या वाढदिवसानिमित्त धनंजय पोवार अर्थात डीपी दादांनी (Dhananjay Powar) खास आपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
निक्कीला शुभेच्छा देताना डीपीदादा निक्कीला घरातील शोभेच्या झाडाची कुंडी निक्कीला दिली. त्यानंतर निक्कीला शुभेच्छा देत डीपी दादा म्हणाले की, "वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. 75 वर्षे जग.. तुझं असचं तारुण्य टिकू देत. लोकांना छळू नकोस. त्यांना त्रास देऊ नकोस. लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक. पण कोणाला काही मानसिक त्रास देऊ नकोस. तुला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा...शुभेच्छूक साधासुधा एक पलिकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस". डीपीदादाच्या या खास शुभेच्छांवर निक्की खळखळून हसते आणि शुभेच्छांचा स्वीकार करते आणि अरे, आज तरी मला माफ करा असे निक्की हसतहसत म्हणते.
View this post on Instagram
निक्कीला आलाय वीट...
आजच्या भागात निक्कीचा वाढदिवस साजरा होत असला तरी अरबाज सोबत तिचा वाद होतो. डीपी दादासोबत बोलताना निक्की सांगते,"मला वीट आलाय. माझा सर्वोत्कृष्ट वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी 'बिग बॉस'ला धन्यवाद म्हणते. माझे डोळे उघडलेत. टॉपला जायचं तर एकत्र जाऊयात. मी एखाद्याला निवडलं ना तर त्याच्यासाठी मी सर्वांसोबत लढू शकते. पण समोरच्याला या गोष्टी कळल्या पाहिजेत. अभिजीत मला समजून घेतो". एकंदरीतच निक्कीला अरबाजच्या वागण्याचा प्रचंड राग आलेला आहे. याबद्दल घरातील इतर सदस्यांकडे ती व्यक्त होताना दिसून येते.