एक्स्प्लोर

Telly Masala : कंगना रणौतला हायकोर्टाकडून धक्का ते जान्हवी-घन:श्याममध्ये राडा; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Emergency Movie : कंगना रणौतला मोठा झटका, 'इमर्जन्सी'चा शुक्रवारचा मुहूर्तही हुकला, सेन्सॉरच्या कात्रीतून कधी सुटणार चित्रपट?

Kangana Ranaut Emergency Movie Release Date : लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाचा मुहूर्त हुकला आहे. सर्टिफिकेट देण्याबाबत सेन्सॉर बोर्डाला थेट आदेश देता येणार नाहीत, असं स्पष्टीकरण हायकोर्टानं दिलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 19 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आल्याने चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार नाही.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Riteish Deshmukh Genelia D'souza Movie : रितेश-जेनेलियाची केमिस्ट्री पुन्हा दिसणार; 'तुझे मेरी कसम' 21 वर्षांनी पुन्हा एकदा रिलीज होणार

Riteish Deshmukh Tujhe Meri Kasam Movie : महाराष्ट्रातील सिनेप्रेमींचे लाडके दादा-वहिनी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख (Genelia Deshmukh) यांनी एकत्र काम केलेला पहिला चित्रपट 'तुझे मेरी कसम' पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अभिनेता रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता हा चित्रपट तब्बल 21 वर्षांनी पुन्हा एकदा रिलीज होत आहे. अभिनेता रितेश देशमुखने आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून ही माहिती दिली.  हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Bigg Boss Marathi : बिग बॉसला आलाय 'मदमस्त' निक्कीचा पुळका? थेट जान्हवीलाच आदेश देत म्हणाले...

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीच्या घरात आता सहावा आठवडा सुरु झाला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात जसजसा एक-एक दिवस पुढे सरकत आहे, तसंतशी समीकरणं बदलताना दिसत आहेत. पहिल्या आठवड्यात  बिग बॉसच्या घरात टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम पाहायला मिळाल्या. पण, आता टीम एमध्ये पूर्णपणे फूट पडल्याचं दिसत आहे. त्यातच जान्हवी आणि निक्की एकमेकींच्या कट्टर दुश्मन झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

OTT Release This Week : 'किल' ते 'तणाव 2', वीकेंडला सस्पेन्स, क्राईम-थ्रिलरपटाची मेजवानी; ओटीटीवर काय पाहाल?

OTT Release This Week : मागील काही दिवसात अनेक चित्रपटांसह वेबसिरिज OTT वर प्रदर्शित झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. ड्रामा, सस्पेन्स, क्राईम-थ्रिलर अशा वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना ओटीटीवर मिळणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Supriya Pilgoankar : श्रियाची आई की सचिनची बायको? सुप्रिया पिळगांवकरांना कोणती हाक जास्त आवडते

Supriya Pilgaonkar :  अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांनी वयाच्या 18 व्या वर्षी सचिन पिळगांवकरांशी (Sachin Pilgaonkar) लग्नगाठ बांधली. त्यानंतर इंडस्ट्रीतही त्यांची ओळख सुप्रिया सचिन पिळगांवकर अशीच राहिली. मला सचिनची बायको म्हणूनच आज ओळख आहे, असं सुप्रिया यांनी म्हटलं होतं. आता 'माझा कट्टा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना कोणत्या नावाने हाक मारलेली जास्त आवडतं यावर भाष्य केलं आहे. सुप्रिया पिळगांवकर यांना श्रियाची (Shriya Pilgaonkar) आई ही ओळख जास्त आवडते की सचिनची बायको ही ओळख जास्त आवडते यावर भावना व्यक्त केल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Ghanshyam Darode : जान्हवीनं तर घन:श्यामच्या चिंध्या केल्या; नेटकरी असं नेमकं का म्हणाले? आजच्या भागात फुल्ल टू राडा!

Bigg Boss Marathi New Season Jahnavi Killekar Ghanshyam Darode :  बिग बॉस मराठीच्या घरात आता सहावा आठवडा सुरू झाला आहे.   बिग बॉसने या आठवड्यात घरातील सदस्यांना 'बीबी फार्म' हा नवा टास्क दिला. या टास्कमध्ये, मंगळवारच्या एपिसोडमध्ये वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) एकमेकांना नडले होते. त्यानंतर आता आजच्या एपिसोडमध्येही घरातील सदस्यांमध्ये राडा होणार आहे. या राड्यामध्ये जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar)  आणि घन:श्याम दरोडे (Ghanshyam Darode) मध्ये झटापट होताना दिसणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.