(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Ghanshyam Darode : जान्हवीनं तर घन:श्यामच्या चिंध्या केल्या; नेटकरी असं नेमकं का म्हणाले? आजच्या भागात फुल्ल टू राडा!
Bigg Boss Marathi New Season : बीबी फार्म टास्कमध्ये घरातील सदस्यांमध्ये राडा होणार आहे. या राड्यामध्ये जान्हवी आणि घन:श्याममध्ये झटापट होताना दिसणार आहे.
Bigg Boss Marathi New Season Jahnavi Killekar Ghanshyam Darode : बिग बॉस मराठीच्या घरात आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. बिग बॉसने या आठवड्यात घरातील सदस्यांना 'बीबी फार्म' हा नवा टास्क दिला. या टास्कमध्ये, मंगळवारच्या एपिसोडमध्ये वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) एकमेकांना नडले होते. त्यानंतर आता आजच्या एपिसोडमध्येही घरातील सदस्यांमध्ये राडा होणार आहे. या राड्यामध्ये जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) आणि घन:श्याम दरोडे (Ghanshyam Darode) मध्ये झटापट होताना दिसणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या टास्कमध्ये सदस्यांना बीबी फार्मची जबाबदारी देण्यात आली आहे. या टास्कमधील गुणांच्या आधारे बीबी करन्सी मिळणार आहे. मंगळवारी, वैभव आणि अरबाज यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. त्याशिवाय, इतर सदस्य देखील आक्रमक झाले होते. त्यांचा हा आक्रमकपणा पाहून ‘बिग बॉस’ सदस्यांना शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार, आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बाद करावे लागणार आहे.
तर, बीबी फार्म टास्कमध्ये प्रतिकात्मक म्हशीच्या दुधाचे संकलन करायचे आहे. जो ग्रुप सर्वाधिक दूध जमवणार तो विजयी होणार आहे. त्यामुळे या टास्कमध्ये दोन्ही गटांकडून एकमेकांवर कुरघोडी होणार आहे. यातच राडाही होणार आहे.
नेटकरी म्हणाले, घन:श्यामच्या चिंध्या झाल्या...
नेटकऱ्यांनी घरातील राड्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी टास्कमध्ये खेळ कमी आणि भांडणे जास्त असे अधिक म्हटले. एकाने म्हटले की, कृपया घन:श्यामला जिवंत घरी जाऊ द्या. तर, एकाने म्हटले की, जान्हवीने तर घन:श्यामच्या चिंध्या केल्या. एका युजरने जान्हवीच्या खेळाचे कौतुक केले.
पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम A’ आणि ‘टीम B’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. परंतु, गेल्या आठवड्यापासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. आज बीबी करन्सीसाठी बीबी फार्ममध्ये सदस्य जोरदार राडा करताना दिसत आहेत.