Supriya Pilgoankar : श्रियाची आई की सचिनची बायको? सुप्रिया पिळगांवकरांना कोणती हाक जास्त आवडते
Supriya Pilgoankar : अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी नुकतच माझा कट्टावर दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना कोणत्या नावाने हाक मारलेली आवडते यावर भाष्य केलेलं आहे.
Supriya Pilgaonkar : अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांनी वयाच्या 18 व्या वर्षी सचिन पिळगांवकरांशी (Sachin Pilgaonkar) लग्नगाठ बांधली. त्यानंतर इंडस्ट्रीतही त्यांची ओळख सुप्रिया सचिन पिळगांवकर अशीच राहिली. मला सचिनची बायको म्हणूनच आज ओळख आहे, असं सुप्रिया यांनी म्हटलं होतं. आता 'माझा कट्टा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना कोणत्या नावाने हाक मारलेली जास्त आवडतं यावर भाष्य केलं आहे. सुप्रिया पिळगांवकर यांना श्रियाची (Shriya Pilgaonkar) आई ही ओळख जास्त आवडते की सचिनची बायको ही ओळख जास्त आवडते यावर भावना व्यक्त केल्या आहेत.
श्रिया पिळगांवकर ही सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची एकुलती एक लेक आहे. श्रियाने एकुलती एक या सिनेमातून तिच्या अभिनयच्या प्रवासाला सुरुवात केली. पण तिला खरी ओळख ही मिर्झापूर या सीरिजमुळे मिळाली. त्यानंतर अनेक सीरिज आणि बॉलीवुड सिनेमांमधून श्रिया प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
श्रियाची आई की सचिनची बायको?
'माझा कट्टा'वर तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारलेली जास्त आवडते, श्रियाची आई की सचिनची बायको? यावर उत्तर देताना सुप्रिया पिळगांवकरांनी म्हटलं की, मला माझ्या लग्नानंतर कुणीही सुप्रिया पिळगांवकर असं म्हटलेलं नाही मला सगळेच सचिनची बायको म्हणूनच ओळखतात आणि ही ओळख मला फार आवडते. त्यानंतर आता लोकं मला श्रियाची आई म्हणून बऱ्याच ठिकाणी ओळख देतात आणि ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे माझ्यासाठी या दोन्हीही ओळख महत्त्वाच्या आहेत.
त्यावर पुढे सचिन पिळगांवकरांनी मिर्झापूर सीरिजच्या वेळी किस्सा सांगताना म्हटलं की, एके ठिकाणी एक व्यक्ती माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आली. त्यावेळी त्या व्यक्तीने मला म्हटलं की, तुम्ही स्विटी गुप्ताचे वडील आहात ना.. श्रियाने मिर्झापूर या सीरिजमध्ये स्विटी गुप्ता हे पात्र साकारलं होतं. त्यामुळे आम्हा दोघांनाही आज जेव्हा श्रियाचे आई वडील म्हणून ओळखतात तेव्हा आम्हाला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो.
दरम्यान येत्या 20 सप्टेंबरला नवरा माझा नवासाचा-2 या सिनेमातून सचिन-सुप्रिया जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जवळपास 19 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही या सिनेमाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे.