OTT Release This Week : 'किल' ते 'तणाव 2', वीकेंडला सस्पेन्स, क्राईम-थ्रिलरपटाची मेजवानी; ओटीटीवर काय पाहाल?
OTT Release This Week : ड्रामा, सस्पेन्स, क्राईम-थ्रिलर अशा वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना ओटीटीवर मिळणार आहे.
OTT Release This Week : मागील काही दिवसात अनेक चित्रपटांसह वेबसिरिज OTT वर प्रदर्शित झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. ड्रामा, सस्पेन्स, क्राईम-थ्रिलर अशा वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना ओटीटीवर मिळणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या वीकेंड वर लक्ष ठेवणाऱ्यांना ओटीटीवरील या सीरीज आणि ॲक्शन चित्रपटांची ही यादी....
किल
या वर्षातल अॅक्शन थ्रिलरपट किल (Kill) आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. एका सत्य घटनेवर हा चित्रपटाची कथा आधारीत आहे. ट्रेनमध्ये दरोडा टाकण्यासाठी एक टोळी ट्रेनमध्ये शिरते. या दरोडेखोरांचा सामना भारतीय सैन्यातील जवान करतो. चित्रपटात राघव जुयाल, आशिष विद्यार्थी, हर्ष छाया, तान्या माणिकतला आणि अभिषेक चौहान यांच्यासोबत लक्ष्य आदींच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश भट यांनी केले.
रिलीट डेट- 6 सप्टेंबर 2024
कुठे पाहता येणार? डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटीवर पाहता येईल.
- कॉल मी बे (Call Me Bae)
ही एक रोमँटिक कॉमेडी वेब सीरिज आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे झळकणार आहे. कथा आधुनिक काळातील असून यामध्ये नातेसंबंधावर भाष्य करण्यात आले आहे. या वेब सीरिजमध्ये अनन्या पांडेसह वीर दास, गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, विहान सामत, मुस्कान जाफेरी, निहारिका लिरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथुर यांच्या भूमिका आहेत.
रिलीट डेट- 6 सप्टेंबर 2024
कुठे पाहता येणार? अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर पाहता येईल
तणाव सीजन 2 (Tanaav Season 2)
'तणाव' या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता याच सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तणाव' ही वेब सीरिज एका स्पेशल टास्क ग्रुपची गोष्ट आहे. दहशतवादाच्या विरोधात त्यांनी केलेल्या कारवाईचे चित्रण यात आहे. 'फौदा' या गाजलेल्या वेब सीरिजचे हे भारतीय रुपांतरण आहे.
रिलीट डेट- 6 सप्टेंबर 2024
कुठे पाहता येणार? सोनी लिव्ह या ओटीटीवर पाहता येईल.
द परफेक्ट कपल (The Perfect Couple)
'द परफेक्ट कपल' ही निकोल किडमन, लिव्ह श्रेबर, डकोटा फॅनिंग आणि इव्ह ह्यूसन यांची भूमिका असलेली एक आगामी अमेरिकन सस्पेन्स ड्रामा सीरिज आहे. एलिन हिल्डरब्रँडच्या त्याच नावाच्या 2018 च्या कादंबरीचे रूपांतर आहे.
रिलीट डेट- 5 सप्टेंबर 2024
कुठे पाहता येणार? नेटफ्लिक्स या ओटीटीवर पाहता येईल.
फॉल गाय (Fall Guy)
हेरगिरी आणि फसवणुकीच्या जगात एक रोमांचक प्रवास यात आहे. यात तुम्हाला जबरदस्त ॲक्शन देखील पाहायला मिळेल.
रिलीट डेट- 3 सप्टेंबर 2024
कुठे पाहता येणार? जियो सिनेमा या ओटीटीवर पाहता येईल.
मॉन्स्टर्स (Monsters)
ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. जगासमोर हे अतिशय सुंदर कुटुंब आहे. पण त्यामागे भयावह रहस्ये दडलेली आहेत. नेमकी कोणती रहस्ये दडली आहेत, हे जाणून घेण्यासाठी मॉन्स्टर्स पाहावे लागेल.
रिलीट डेट- 3 सप्टेंबर 2024
कुठे पाहता येणार? जियो सिनेमा या ओटीटीवर पाहता येईल.