एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : बिग बॉसला आलाय 'मदमस्त' निक्कीचा पुळका? थेट जान्हवीलाच आदेश देत म्हणाले...

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आता जान्हवी विरुद्ध निक्की असं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या आठवड्यातही घरात फुल्ल ऑन राडा पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीच्या घरात आता सहावा आठवडा सुरु झाला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात जसजसा एक-एक दिवस पुढे सरकत आहे, तसंतशी समीकरणं बदलताना दिसत आहेत. पहिल्या आठवड्यात  बिग बॉसच्या घरात टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम पाहायला मिळाल्या. पण, आता टीम एमध्ये पूर्णपणे फूट पडल्याचं दिसत आहे. त्यातच जान्हवी आणि निक्की एकमेकींच्या कट्टर दुश्मन झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बिग बॉसला आलाय 'मदमस्त' निक्कीचा पुळका? 

निक्की आणि अरबाज यांच्यातील नातं त्यांच्याशिवाय बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरातील इतरांना समजण्याच्या पलिकडे गेलं आहे. गेल्या आठवड्यात निक्कीच्या विरोधात तांडव करणार अरबाज आता तिच्या शेजारी बसून गप्पा मारताना दिसत आहे. या सर्व प्रकारामुळे घरातील इतर सदस्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अरबाजने आपला वापर केल्याची भावना जान्हवी आणि वैभवच्या मनात उत्पन्न झाली आहे. निक्की आणि अरबाजमधील भांडण मिटल्यानंतरही जान्हवी आणि वैभवने मात्र त्यांच्यापासून चार हात लांब राहणं पसंत केलं आहे. निक्की आणि जान्हवी यांच्यात कट्टर दुश्मनी पाहायला मिळत आहे.

थेट जान्हवीलाच आदेश देत म्हणाले...

काल बिग बॉसच्या घरात निक्कीने घरातील काम करण्यास नकार दिला, त्याशिवाय तिने झोपून नियमही मोडला. या आठवड्यात काम करणार नसल्याची भूमिका निक्कीने घेतली आहे. यामुळे घरातील इतर सदस्य काम करत असताना निक्की मात्र खाऊन-पिऊन आराम करताना दिसत आहे. आजच्या भागात याच कारणावरुन जान्हवी आणि निक्कीमध्ये वाद पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळी बिग बॉस निक्कीसाठी जान्हवीला आदेश देताना दिसणार आहेत.

बिग बाॉसनं केली निक्कीच्या चहाची सोय

बिग बॉसने जान्हवीला आदेश देत निक्कीसाठी चहा बनवण्यास सांगितल्याचं आज पाहायला मिळणार आहे. आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये जान्हवी चहा बनवताना दिसत आहे. यावेळी बिग बॉस निक्कीला विचारतात चहा हवाय का? यावर निक्की, "हो, पाहिजे बिग बॉस असं उत्तर देते. यानंतर बिग बॉस जान्हवीला म्हणतात की, जान्हवी निक्कीसाठी एक कप चहा वाढवाल का?" यावर जान्हवी नाही असं उत्तर देत म्हणते, "तुमचा आदेश असेल तर करेन फक्त तुमच्यासाठी बिग बॉस". पुढे बिग बॉस म्हणतात, मग माझ्यासाठी वाढवाल?" यावर जान्हवी म्हणते, "ओके, बिग बॉस फक्त तुमच्यासाठी". पुढे बिग बॉस म्हणतात, "मला प्यावासा वाटतोय". जान्हवी यानंतर निक्कीला टोमणा मारत म्हणते की, "निक्कीचा चहा बनवताना थोडी अक्कल किसून घालू शकते का मी?" हा प्रोमो पाहता आज निक्की आणि जान्हवीमध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळणार आहे, एवढं मात्र नक्की.

पाहा व्हिडीओ : जान्हवी निक्कीसाठी बनवणार ‘अक्कल’ चहा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : 'बॉयकॉट बिग बॉस मराठी, आजपासून शो बघणं बंद, निक्कीला ट्रॉफी देऊन टाका'; रितेश भाऊवर नेटकरी भडकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget