एक्स्प्लोर
बिग बॉसच्या दहाव्या पर्वाचा प्रोमो रिलीज
नवी दिल्ली: बिग बॉसच्या दहाव्या पर्वाचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. कलर्स चॅनेलचे सीईओ राज नायक यांनी ट्विटरवर बिग बॉसच्या दहाव्या पर्वाचा पहिला प्रेमो पोस्ट केला आहे. 'लवकरच सुल्तान सलमानसोबत बिग बॉस 10 येत आहे,' असे नायक यांनी ट्वीटमध्ये म्हणले आहे. या नव्या प्रोमोमुळे बिग बॉसचे दहावे पर्वदेखील सलमान खानच होस्ट करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या नव्या पर्वाचा पहिलाच प्रोमो अतिशय मनोरंजक असून, यामध्ये सलमान खानला अंतराळवीर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या नव्या पर्वाची थीम अंतराळच असण्याची शक्यता सलमानचे चाहते व्यक्त करत आहेत.
31 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये सलमान अंतराळ यानातून बाहेर येताना दिसत आहे. ''जेव्हा चंद्रावर माणसाने पहिल्यांदा पाय ठेवले, आणि अंड्यातून पहिल्यांदा कोंबडीने जन्म घेतला, तेव्हा इतिहास रचला गेला... आता सर्वसामान्य व्यक्ती पहिल्यांदाच बिग बॉसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे नवा इतिहास रचला जाईल. पण यानंतर काय होईल दॅट इज द मिस्ट्री... बिग बॉस सीझन 10 विथ कॉमन वुमेन अॅन्ड मॅन,'' असे सलमान या व्हिडीओत म्हणतो.
बिग बॉस 10चा नवा प्रोमोचा व्हिडीओ पाहा
Feel the fizz - Coming soon @BiggBoss with the #Sultan @BeingSalmanKhan #BB10 @iamappyfizz @oppomobileindia pic.twitter.com/uoVsFrHrpN
— Raj Nayak (@rajcheerfull) August 27, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement