एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार नाही; निर्मात्यांनी सांगितलं कारण

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीची एन्ट्री होणार नसल्याचं निर्माते असित मोदी यांनी सांगितलं आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीची (Disha Vakani) पुन्हा एन्ट्री होणार असल्याची चर्चा होती. पण आता या मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री होणार नसल्याचं निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनी सांगितलं आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दिशा वकानीची एन्ट्री होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दिशाची एन्ट्री होणार असल्याचे प्रोमो आऊट करण्यात आले आहेत. पण काही ना काही कारणाने दयाबेनच्या भूमिकेत दिशा दिसलेली नाही. त्यामुळे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे प्रेक्षक नाराज झाले आहेत. ते ही मालिका बायकॉट करण्याची मागणी करत आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दिशाची एन्ट्री होणार? 

आज तकला दिलेल्या मुलाखतीत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असित मोदी म्हणाले की,"दिशासोबत माझं बोलणं झालं. पुन्हा कमबॅक करण्यासाठी तिने होकार दिला होता. पण शेवटच्या क्षणी तिचा निर्णय बदलला. त्यामुळे मालिकेत तिची एन्ट्री झाली नाही. दिशाचं कुटुंब आहे. तिला दोन लहान मुलं आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याचाही आदर करायला हवा". 

असित मोदी पुढे म्हणाले,"नव्या दयाबेनचा शोध सुरू आहे. ऑडिशन सुरू आहे. जेव्हा दयाबेनच्या भूमिकेसाठी एखाद्या अभिनेत्रीची निवड होईल तेव्हा चाहत्यांसोबत नक्कीच ही आनंदाची बातमी शेअर केली जाईल. खरं तर दिशाने आमच्यासोबत पुन्हा काम करावं, अशी आमची इच्छा आहे. दिशाने कमाल काम केलं आहे. तिच्यापेक्षा अधिक चांगलं काम करणारं अद्याप आम्हाला कोणी सापडलेलं नाही.

माझ्यासोबत काम करणाऱ्यांबद्दल मी कधी वाईट बोलत नाही : असित मोदी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील कॉन्ट्रोवर्सीबद्दल बोलताना असित मोदी म्हणाले,"माझ्यावर जे आरोप केले गेले ते मालिकेचं शूटिंग सुरू असताना का केले गेले नाही, असा प्रश्न मला पडला आहे. त्यावेळी त्यांना काही फरक पडला नाही. माझ्यासोबत काम करणाऱ्यांबद्दल मी कधी वाईट बोलत नाही. सर्वांचा आदर करायला मला आवडतं. पण चुकीचे आरोप लागल्यावर नक्कीच वाईट वाटतं. पण कामावर लक्ष ठेवण्याचा मी प्रयत्न करतो". 

संबंधित बातम्या

Taarak Mehta ka ooltah chashmah: Boycott TMKOC ट्रेंडनंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' घेणार प्रेक्षकांचा निरोप? असित मोदी म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सWorking HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Embed widget