Taarak Mehta ka ooltah chashmah: Boycott TMKOC ट्रेंडनंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' घेणार प्रेक्षकांचा निरोप? असित मोदी म्हणाले...
सोशल मीडियावर 'बॉयकॉट तारक मेहता का उल्टा चष्मा' हा हॅशटॅग देखील ट्रेंड झाला होता. अशातच ही मालिका बंद होणार आहे, अशी चर्चा देखील सुरु होती. आता या सर्व चर्चांवर मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनी मौन सोडलं आहे.
![Taarak Mehta ka ooltah chashmah: Boycott TMKOC ट्रेंडनंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' घेणार प्रेक्षकांचा निरोप? असित मोदी म्हणाले... Taarak Mehta ka ooltah chashmah going off air after boycott asit modi revealed the Truth Taarak Mehta ka ooltah chashmah: Boycott TMKOC ट्रेंडनंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' घेणार प्रेक्षकांचा निरोप? असित मोदी म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/90f400212b503a3cc64ba306def6d80b1701766251321259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Taarak Mehta ka ooltah chashmah: छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) हा शो सध्या चर्चेत आहे. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र या शोबाबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. दयाबेनला मालिकेत परत न आणल्यामुळे प्रेक्षकांनी या बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर 'बॉयकॉट तारक मेहता का उल्टा चष्मा' हा हॅशटॅग देखील ट्रेंड झाला होता. अशातच ही मालिका बंद होणार आहे, अशी चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु होती. आता या सर्व चर्चांवर मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनी मौन सोडलं आहे.
काय म्हणाले असित मोदी?
असित मोदी यांनी एका मुलाखतीत मालिकेबाबत सुरु असणाऱ्या वादावर चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, हा शो बंद होणार नाही आणि शो बंद होणार आहे, या केवळ अफवा आहे. यादरम्यान दयाबेन मालिकेमध्ये परतण्याबाबत त्यांनी सांगितले की, "दयाबेनच्या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध सुरू आहे. कोणीतरी कलाकार भूमिकेसाठी सापडताच ही भूमिका मालिकेत परत आणण्यात येईल."
शोमध्ये दयाबेन परत येणार?
असित मोदी यांनी पुढे मुलाखतीमध्ये सांगितलं की, मी येथे माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आलो आहे. त्यांच्याशी खोटे बोलण्यासाठी मी आलेलो नाही. काही अडचणींमुळे आम्ही दयाबेनची भूमिका परत आणू शकलो नाही. याचा अर्थ असा नाही की, आम्ही दयाबेनचे पात्र पुन्हा शोमध्ये आणणार नाही. दिशा वाकानी दयाबेनची भूमिका साकारणार असून, तिची जागा दुसरी कोणी घेणार का? हे येणारा काळच सांगेल. पण मी वचन देतो की दयाबेनची व्यक्तिरेखा शोमध्ये नक्कीच परत येईल."
अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेमध्ये दयाबेनची भूमिका साकारत होत्या. दयाबेन गेल्या काही वर्षांपासून शोमध्ये दिसलेली नाही . पण अलीकडेच दयाबेन शोमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरु होती.परंतु दयाबेन शोमध्ये परतल्या नाहीत, त्यानंतर प्रेक्षक संतप्त झाले.Boycott TMKOC हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला.
तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta ka ooltah chashmah) या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)