Avadhoot Gupte: "मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत असताना छोटी स्वप्न पूर्ण करायचं राहूनच जातं.."; अवधूत गुप्तेनं शेअर केला खास व्हिडीओ
नुकताच अवधूतनं (Avadhoot Gupte) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो गायक स्वप्नील बांदोडकर (Swapnil Bandodkar) देखील दिसत आहे.
Avadhoot Gupte: गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) हा विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. त्याच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. अवधूत हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतो. नुकताच अवधूतनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो गायक स्वप्नील बांदोडकर (Swapnil Bandodkar) आणि अजित परब (Ajit Parab) यांच्यासोबत बोटींग करताना दिसत आहे.
अवधूत गुप्तेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो, स्वप्नील बांदोडकर आणि अजित परब हे बोटमध्ये बसलेले दिसत आहेत. या व्हिडीओला अवधूतनं कॅप्शन दिलं, 'दरवर्षी धरण भरलं की, पाणी गळाभेट घ्यायला आल्यासारखं डोंगराच्या पायथ्याशी यायचं आणि मी सुद्धा पाय बुचकळून तासंतास बसायचो! दरवर्षी मनात यायचं की, ह्यापेक्षा जास्त जवळ जायला हवं त्याच्या पण त्यासाठी स्वतःची बोट असायला हवी. मनात आलं, की टाकली पाण्यात आणि सुरुवात केली वल्हवायला! मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत असताना छोटी स्वप्न पूर्ण करायचं राहूनच जातं..झालं!! त्यातलं हे एक पूर्ण केलं!!! ते सुद्धा स्वप्निल बांदोडकर आणि अजित परब सारख्या मित्रांच्या साथीनं..'
अवधूतनं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'कोल्हापुरातून डायरेक्ट कोकण विषय हार्ड अवधूत दादा'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस येत होता. आता त्या कार्यक्रमानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या कार्यक्रमात अमृता खानविलकर , सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी या कलाकारांनी हजेरी लावली होती. काही नेत्यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
अवधूत हा आता 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे तो परीक्षण करणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) ही करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :