एक्स्प्लोर

Khupte Tithe Gupte: 'खुपते तिथे गुप्ते शो का बंद करतोय?'; नेटकऱ्याचा प्रश्न; अवधूत गुप्ते म्हणाला, 'लवकरच...'

Khupte Tithe Gupte: खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम बंद का केला? असा प्रश्न नुकताच एका नेटकऱ्यानं अवधूत गुप्तेला (Avadhoot Gupte)  विचारला. अवधूत गुप्तेनं या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग रविवारी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली. खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम बंद का केला? असा प्रश्न नुकताच एका नेटकऱ्यानं अवधूत गुप्तेला (Avadhoot Gupte)  विचारला. अवधूत गुप्तेनं या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

ट्विटरवर अवधूत गुप्तेला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला, 'खुप छान शो….आम्ही नेदरलँडमध्ये हा शो पाहतो आणि हा शो आम्हाला आवडतोही….का बंद करतोय? लई भारी वाटतंय अवधुतदा'  नेटकऱ्याच्या या ट्वीटला अवधूतनं रिप्लाय दिला, 'पुढचा सीझन लवकरच करनार की वो दादा!!' आता ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या पुढच्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

सुप्रिया सुळे यांनी खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या शेवटच्या एपिसोडमध्ये हजेरी  लावली होती. या कार्यक्रमाचा एक प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सुप्रिया सुळे या भावूक झालेल्या दिसल्या. तसेच अवधूत गुप्तेनं  खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये  सुप्रिया सुळे यांना विविध विषयांवर आधारित असणारे प्रश्न देखील विचारले.  अवधूत गुप्ते  हा खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारतो, "कोण प्रभावी उपमुख्यमंत्री आहेत? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?"  या प्रश्नाचं सुप्रिया सुळे या "अजित पवार" असं उत्तर देतात. 

राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमात अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी या कलाकारांनी हजेरी लावली होती. आता खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचं हे नवं पर्व 10 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता या कार्यक्रमाचे पुढील पर्व कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार?याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Khupte Tithe Gupte: अजित पवार की देवेंद्र फडणवीस, कोण प्रभावी उपमुख्यमंत्री? गुप्तेंचा प्रश्न, ताईंचं उत्तर कुणाला खुपणार?

 

 
 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget