![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'एकदा येऊन तर बघा' नंतर प्रसाद खांडेकरनं केली नव्या चित्रपटाची घोषणा; स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह अनेक कलाकारांचा कल्ला
Prasad Khandekar: नुकताच प्रसादनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माझ्यमातून प्रसादनं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
!['एकदा येऊन तर बघा' नंतर प्रसाद खांडेकरनं केली नव्या चित्रपटाची घोषणा; स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह अनेक कलाकारांचा कल्ला Prasad Khandekar new movie share video of Prajakta Mali Prarthana Behere and swapnil joshi 'एकदा येऊन तर बघा' नंतर प्रसाद खांडेकरनं केली नव्या चित्रपटाची घोषणा; स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह अनेक कलाकारांचा कल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/05/dd7e5dc58a317bc02fe2b0e12fe268761704460607785259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Prasad Khandekar: अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकरचा (Prasad Khandekar) 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. आता 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपाटानंतर प्रसाद खांडेकरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच प्रसादनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माझ्यमातून प्रसादनं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
प्रसादच्या आगामी चित्रपटात कलाकारांची फौज
अभिनेता स्वप्नील जोशी,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे हे कलाकार प्रसादनं शेअर केलेल्या या व्हिडीओत दिसत आहेत. एकंदरीतच नव्या वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी या चित्रपटामुळे मिळणार आहे.
'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या जोरदार यशानंतर दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्या या नव्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली नसली तरी चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट, आयडियाज एंटरटेनमेंट, स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर व श्री नारकर आहेत तर परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकरयांचे असून दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांचे आहे. मंदार चोळकर यांनी गीतलेखन तर रोहन-रोहन यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची स्टार कास्ट
'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. प्रसाद खांडेकरनं 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित, ओंकार भोजने,विशाखा सुभेदार, वनिता खरात यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)